Dhruv Rathee FIR : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणारे लोकप्रिय YouTuber ध्रुव राठी (Dhruv Rathee) आता एका नवीन प्रकरणामुळे सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ध्रुव राठीवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची मुलगी अंजली बिर्ला (Anjali Birla) यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) न देता अधिकारी झाली असल्याचा ट्विट ध्रुव राठी यांनी काही दिवसापूर्वी केला होता. आता या प्रकरणात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ध्रुव राठीवर गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी या प्रकरणात ध्रुव राठीवर भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत मानहानी, देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करणे, शांतता भंग आणि आयटी या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, अंजली बिर्ला यांचा चुलत भाऊ नमन माहेश्वरी यांनी ध्रुव राठीविरोधात दाखल केला आहे.
त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2019 मध्ये अंजली बिर्ला यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली होती मात्र तरीही राठीने अंजलीची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी केली आणि त्यांची परवानगी न घेता अंजलीचा फोटोही वापरला असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
ध्रुव राठी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, भारत हा एकमेव देश आहे जिथे तुम्ही परीक्षेला बसल्याशिवाय UPSC पास करू शकता मात्र यासाठी तुम्हाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी म्हणून जन्माला यावे लागेल. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला कोणतीही परीक्षा न देता UPSC उत्तीर्ण झाली, ती व्यवसायाने मॉडेल आहे, मोदी सरकार आपल्या शिक्षण व्यवस्थेची खिल्ली उडवत आहे. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र आपण असा कोणताही ट्विट केला नाही असं ध्रुव राठी यांनी म्हटले आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जलवा; भाजपला धक्का देत सहा जागा जिंकल्या
कोण आहे ध्रुव राठी?
ध्रुव राठी एक लोकप्रिय YouTuber आहे. ध्रुव राठी यांचा जन्म हरियाणातील रोहतक येथे झाला होता त्यांनी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले. सध्या ते जर्मनीला राहतात. आता ते YouTuber म्हणून काम करत आहे. युट्युबवर त्यांचे व्हिडिओ नेहमीच चर्चेचे विषय ठरतात.