घोषणा लिहीलेले टी शर्ट अन् संसदेचं कामकाज झालं ठप्प; सभागृहात नेमकं काय घडलं?

Budget Session : गुरुवारी दिवसभर संसदेचं कामकाज (Parliament Budget Session) ठप्प झालं होतं. दिवसभरात सुरुवातीचे काही मिनिटे सोडली तर एकही प्रश्न विचारला जाऊ शकला नाही. कोणत्याच विषयावर चर्चा होऊ शकली नाही. अशीच स्थिती लोकसभेतही दिसून आली. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आले. खरंतर काही घोषणा लिहीलेल्या टी शर्टमुळे संसदेचे कामकाज बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संसदेत नेमकं काय घडलं?
द्रमुक पक्षाचे खासदार संसदेत परिसीमन धोरणाचा सातत्याने विरोध करत आहेत. परिसीमन लोकसभा मतदारसंघांशी संबंधित आहे. परिसीमन झाले तर तामिळनाडू आणि दक्षिणेतील अन्य राज्यांच्या लोकसभेतील जागा कमी होतील अशी भीती तामिळनाडूतील नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून या संभाव्य धोरणाला विरोध केला जात आहे. याचसाठी आज द्रमुक खासदारांनी संसदेत विरोध केला. संसदेच्या बाहेरही हातात फलक घेत निदर्शने केली.
#WATCH दिल्ली: DMK सांसद टी शिवा संसद में एक टी-शर्ट पहनकर पहुंचे, जिस पर लिखा था, “निष्पक्ष परिसीमन, तमिलनाडु लड़ेगा, तमिलनाडु जीतेगा।”
उन्होंने कहा, “तमिलनाडु निष्पक्ष परिसीमन पर जोर दे रहा है। इससे करीब 7 राज्य प्रभावित होंगे, लेकिन सरकार की ओर से अभी तक कोई प्रतिक्रिया नहीं… pic.twitter.com/f2gvBpalp7
— ANI_HindiNews (@AHindinews) March 20, 2025
DMK नेत्याच्या मुलानेच बनवलं होतं रुपयाचं चिन्ह; तामिळनाडू सरकारने का हटवलं?
या परिसीमनाच्या संदर्भात घोषणा लिहीलेले टी शर्ट परिधान करून खासदार सभागृहात आले होते. यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर अध्यक्षांनी कामकाजच स्थगित करून टाकले. सदनात कोणत्याही प्रकारच्या घोषणा लिहून प्रवेश करणे योग्य नाही. असे टी शर्ट घालून येणे योग्य नाही असे ओम बिर्ला यावेळी म्हणाले.
कामकाज सुरू होताच गदारोळ
लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनांचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच स्थगित करावे लागले. सुरुवातीला राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. नंतर कामकाज सुरू होताच पुन्हा 12.15 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेतही अशीच स्थिती दिसून आली. तामिळनाडूचे खासदार विरोध करण्यासाठी सभागृहात घोषणा लिहीलेले टी शर्ट घालून आले होते. यावर स्पीकर ओम बिर्ला यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनीही सभागृहाचे कामकाज स्थगित केले. या दरम्यान राज्यसभेत शून्य काळ आणि प्रश्नोत्तराचा तास काही झाला नाही.
याव्यतिरिक्त राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा होणार होती. मंत्रालयातील विविध विभागांच्या कामकाजावरही चर्चा होणार होती. या चर्चेनंतर गृहमंत्री अमित शाह उत्तर देणार होते. पण तामिळनाडूच्या खासदारांनी गोंधळ घातल्याने कामकाज स्थगित करावे लागले. त्यामुळे कोणतीच चर्चा होऊ शकली नाही. गृह मंत्रालयाच्या कामकाजावर बुधवारपासून चर्चेला सुरुवात झाली होती. यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही खासदारांनी चर्चा केली होती. परंतु, बुधवारी वेळ संपल्यामुळे त्यांना अधिक बोलता आले नाही.
उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय दुसरं.. तामिळनाडूच्या मंत्र्याची जीभ घसरली