Download App

Dilip Sopal यांनी जागवल्या बापटांच्या आठवणी : स्पोर्ट शूज घालून झोपणारा मित्र गेला…

सोलापूर : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची मैत्री राज्यात सर्वश्रुत आहे. बापट यांच्या निधनानंतर सोपल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मैत्रीची आठवणींना उजाळा दिला आहे.

स्व. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल साहेब यांची जिगरी मैत्री होती. त्यातून अनेक किस्से ऐकायला अनुभवायला मिळाले. विधिमंडळाची लॉबी असो, मॅजेस्टिक आमदार निवासातील खोली असो की सार्वजनिक व्यासपीठ, दोघेही एकत्र आले की हास्य कल्लोळ ठरलेला असायचा.

असाच एक किस्सा दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिलीप सोपल सांगतात की, नागपूर अधिवेशन काळातील मॉर्निंग वॉकचा हा प्रसंग आहे. अधिवेशन काळात गिरीश बापट आणि मी एक संकल्प केला. बापट म्हणाले की चला सोपल स्पोर्ट शुज घेऊ. दोघांनी स्पोर्ट शुज घेतला. सकाळी ६ ला नागपूरच्या थंडीत मॉर्निंग वॉकला जायचेच असा निश्चय करून आम्ही आपापल्या रूमकडे गेलो. सकाळी ठरल्याप्रमाणे मी बापटांच्या रूमवर गेलो. दरवाजा ठोठावला त्यांचा पीए डोळे चोळत बाहेर आला. मी म्हटले अरे उठव तुझ्या साहेबांना. पीए म्हणाला साहेब वॉकिंगला जाऊन आलेत आणि परत झोपलेत. मी पाहिले तर खरच बापट शुज घालून झोपलेले होते. म्हटले आपल्याला उशीर झाला म्हणून मी गेलो वॉकिंगला.

गिरीश बापट अधिकाऱ्यांना नडले ! अनेकांना सरळ केले – Letsupp

परत विधिमंडळात भेट झाल्यावर बापट बोलले आरे दिलीप सकाळी उशिरा का आला? मी बोललो झाला उशीर परत दुसऱ्या दिवशी गेलो. परत तसाच प्रसंग. वॉकिंग शुज घालून बापट झोपलेले होते. पीएचेही तेच उत्तर आताच येऊन झोपलेत. दोन-तीन दिवस हे असेच चालले होते. जरा संशय आला काहीतरी गडबड आहे.

चौथा दिवस पुन्हा पीए बाहेर आला. त्याला विश्वासात घेतले काय गडबड आहे नक्की म्हणून विचारले, तर त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अहो सोपल साहेब तुमची लय धास्ती घेतलीय साहेबांनी. थंडीत कुठे उठून मॉर्निंग वॉकला जायचे म्हणून वॉकिंग शुज घालूनच झोपतात आणि तुम्ही आले की आताच आले वॉकिंग वरून आलो, असे मला सांगायला लावतात. मग मी विधिमंडळ लॉबीत नाव न घेता बापटासमोर जेंव्हा हा प्रसंग सांगितला. तेंव्हा मात्र माझा पीए फुटला काय की म्हणून या गंमतीची त्यांनी पण मजा घेतली, अशी आठवण माजी मंत्री दिलीप सोपल यांनी गिरीश बापट यांच्याविषयी जागवत सोशल मीडियावर शेअर केली आहे.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us