बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Buldhana Collector Office) स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे.
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. मागील तीन दिवसांपासून तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत असल्यानं पोलीस प्रशासनावरील ताण वाढल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर आज अचानक तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकरांच्या या कृतीनं एकच खळबळ उडालीय.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत आज शनिवारी, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी जाहीर केलं होतं.
नेमके बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार? हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा, अशी आक्रमक भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरांनी मांडलीय.
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्था ढासळली; अजित पवारांचा घणाघात
तुपकर यांच्या भूमिकेमुळं संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. पोलिसांनी तुपकरांना नोटीसदेखील बजावली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून ते भूमिगत होते. त्यानंतर आज तुपकरांनी पोलिसांच्या वेशात बुलडाणा जिल्हाधिकारी परिसरात दाखल होते स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.