मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा चालू आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणले की, ते पक्षावर नाराज नाहीत. सध्या ते त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. पण ते पक्षावर नाराज नाहीत पण त्यांच्या पुढच्या निवडणुकाबद्दल मला माहित नाही. असं देखील ते म्हणाले.
याशिवाय मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केलं होत. त्यावर देखील त्यांनी आमचे कोणीही आमदार नाराज नाहीत, असं ते म्हणाले.
याशिवाय विरोधी पक्षनेते अजित पवार देखील पक्षावर नाराज असल्याचा चर्चा आहेत. त्यावर देखील वळसे पाटील यांनी भाष्य केलं, ते म्हणाले की, अजित पवार यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चामध्ये काही तथ्य नाही. अजित पवार यांच्याकडे पक्षांची जी जबाबदारी आहे. ती ते पार पाडत आहेत. अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.
दरम्यान आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार नाराज असतील तर त्यांनी आमच्या पक्षात यावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू. असं विधान त्यांनी केलं. त्यावर देखील वळसे पाटील यांनी खोचक उत्तर दिले. ते म्हणाले की, अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवले यांना आधी बहुमत आणावं लागेल.
दरम्यान आज शरद पवार काही कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी अजित पवार भाजप जाण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत. यावर प्रश्न विचारले, त्यावर शरद पवार उत्तर न देता निघून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य