‘बाप तो बाप रहेगा’वरून गायकवाड-महाले वाद पुन्हा पेटला; नव्या व्हिडीओने राजकीय वातावरण तापलं

Dispute Sanjay Gaikwad and Shweta Mahale : दोन्ही आमदार महायुतीचं प्रतिनिधित्व करत असल्याने या वादाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

News Photo   2026 09 18T161759.466

Dispute Sanjay Gaikwad and Shweta Mahale

Dispute Sanjay Gaikwad and Shweta Mahale : बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना (Gaikwad) आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील राजकीय वाद पुन्हा चर्चेत आला आहे. ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर महाले यांनी सोशल मीडियावर नवा व्हिडीओ शेअर करत गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यामुळे महायुतीतील दोन्ही आमदारांमधील संघर्ष आणखी वाढल्याचं दिसत आहे.

या वादाची सुरुवात महाले यांच्या एका कार्यक्रमातील व्हिडीओवरून झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि आक्षेपार्ह हावभाव केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतरही महाले आणि गायकवाड यांच्यातील शाब्दिक संघर्ष थांबलेला नाही. महाले यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओत, “लगाओ जोर अपने तालुकात का, जरा हम भी तो जाणे तुम्हारा कौन बाप…” अशा आशयातून गायकवाड यांना टोला लगावला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील भाजप-शिवसेना संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दोन्ही आमदार महायुतीतील घटक पक्षांचे प्रतिनिधित्व करत असल्याने या वादाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. महाले यांच्या नव्या व्हिडीओवर गायकवाड काय प्रतिक्रिया देतात आणि वरिष्ठ नेते या वाढत्या वादावर कोणती भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Exit mobile version