Download App

पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन; ..अन्‍यथा ३१ ऑक्‍टोबरला पेट्रोलपंप बंद करणार

असोसिएशनच्या सभासदांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर एलडीओ विक्री केंद्रांना माहिती घेण्याच्या उद्देशाने भेट दिली. त्या वेळी अनेक

  • Written By: Last Updated:

District Petro Dealers Welfare Association : जिल्‍हा पेट्रो डीलर्स वेल्‍फेअर असोसिएशनने केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. एक महिन्यापासून अवैधरीत्या सुरू झालेल्या बेकायदेशीर लाइट डिझेल ऑइल (एलडीओ) विक्री केंद्रांची तपासणी करत नियमानुसार कारवाई करण्याची मागणी जिल्‍हा पेट्रो डीलर्स वेल्‍फेअर असोसिएशनने केली आहे. मागणीचा विचार न झाल्‍यास ३१ ऑक्‍टोबरला असोसिएशनने एक दिवसाच्या लाक्षणिक बंदचा इशारा जिल्‍हा प्रशासनाला दिला आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष विजय ठाकरे यांनी दिली आहे.

असोसिएशनच्या सभासदांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर एलडीओ विक्री केंद्रांना माहिती घेण्याच्या उद्देशाने भेट दिली. त्या वेळी अनेक अनियमितता आढळून आल्या. बहुतांश केंद्रांनी कृषी जमिनीवर कुठलीही एनए परवानगी न घेता व्यावसायिक विक्री सुरू केली आहे असं असोसिएशनच्‍या निवेदनात म्‍हटलं आहे.

कुठल्याही केंद्राकडे खरेदीचे बिल अथवा इनव्हॉइस नाही. तीन ते सहा हजार लिटर प्लॅस्टिकच्या टाक्यांमध्ये इंधन साठवलेलं आहे. त्यासाठीची संबंधित विभागाची परवानगी घेतलेली नाही. विक्री करण्याच्या युनिटवर ‘व्‍यावसायिक वापरासाठी नाही’ असं लिहिलेले आहे. वजनमाप विभागाकडून पडताळणी न करताच राजरोस विक्री सुरू आहे.

पाकिस्तानात लॉकडाऊन! ना लग्न ना पार्टी, शाळा-कॉलेजही बंद; नेमकं काय घडतंय?

यासह इतर अनेक अनियमितता असल्‍याचा आरोप असोसिएशनने जिल्‍हा प्रशासनाला दिलेल्‍या निवेदनातून केला आहे. विविध विभागांची पथके बनवून तपासणी करावी व ग्राहक, शेतकरी, शासनाचे महसूल विभागाचं नुकसान टाळावं. या घटनांमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांमध्ये असंतोष आहे.

एक महिन्यापासून अवैध बाबीसाठी दाद मागत आहोत. मात्र, कारवाई होण्याऐवजी बेकायदेशीरपणा वाढत असल्‍याचा आरोप केला आहे. नियमानुसार कारवाई न झाल्यास ३१ ऑक्‍टोबरला जिल्ह्यातील सर्व सुमारे साडेचारशे पेट्रोलपंप एक दिवसाचा निषेध म्हणून लाक्षणिक बंद ठेवले जातील, असं स्‍पष्ट केलं आहे.

follow us

संबंधित बातम्या