‘आप’ला मोठा दिलासा! केंद्र सरकारला भिडणारा नेता संजय सिंह यांना जामीन मंजूर
Delhi Liquor Policy Case : कथित दिल्ली दारु घोटाळाप्रकरणातून आज आम आदमी पक्षाचे (AAP)नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिण्यानंतर संजय सिंह (Sanjay Singh )यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवासांपासून आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या (ED)हीटलीस्टवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. ईडीने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)आणि खासदार संजय सिंह यांनाही अटक केली होती. त्यात आता संजय सिंह यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारवर सातत्यानं तोफ डागणारे संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन देण्यास मंजूर दिली आहे.
ठाकरेंचा एका दगडात दोन ‘पक्षांवर’ निशाणा; उन्मेष पाटील अन् करण पवारांचा भाजपला ‘राम-राम’
खासदार संजय सिंह यांना कथित दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने अटक केली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये संजय सिंह यांना जामीन न्यायालयाने नाकारला होता. आता मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय सिंह यांचं बाहेर येणं ही आम आदमी पक्षासाठी आनंदाची बातमी समजली जात आहे.
Supreme Court directs to release AAP MP Sanjay Singh on bail during the pendency of trial in a money laundering case relating to excise policy irregularities matter.
(File photo) pic.twitter.com/fBfcdHAWST
— ANI (@ANI) April 2, 2024
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील कथित दिल्ली दारु घोटाळाप्रकरणाशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार जेलमध्ये पोहोचले आहेत. यात आधीपासूनच खासदार संजय सिंह, मनीष सिसोदिया आणि के. कविता हे या जेलमध्ये आहेत.
Loksabha Election 2024 : हातकणंगलेचा उमेदवार बदलणार? धैर्यशील मानेंनी सांगितली रिअल स्टोरी
केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर आता संजय सिंह यांच्या सुटकेला ईडीकडून कोणताही विरोध झाला नाही, त्यामुळे सिंह यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
खासदार संजय सिंह हे भाजप आणि केंद्र सरकारवर कायम टीका करत असतात. आपची धडाडणारी तोफ म्हणून संजय सिंह यांची ओळख आहे. यापूर्वी संजय सिंह यांनी जेलमधूनच राज्यसभेची निवडणूक लढवली होती.
ही निवडणूक बिनविरोध पार पडल्यामुळे सिंह हे दुसऱ्यांदा खासदार झाले. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय सिंह यांच्या बाहेर येण्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांची मानसिक ताकद वाढणार आहे.