Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना चार मार्चपर्यंत CBI कोठडी
नवी दिल्ली : मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने (CBI) आठ तासाच्या चौकशीनंतर काल रात्री अटक केली. त्यानंतर आज त्यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयने न्यायालयाकडे सिसोदियांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती. सीबीआयने केलेल्या कोठडीची मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे.
जुलै 2022 मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदिया यांच्या विरुद्ध तपास सुरू केला. अखेर काल दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली होती. सिसोदिया यांच्यावर अबकारी विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या मद्य परवान्यासाठी खासगी विक्रेत्यांना 144 कोटी 36 लाख रुपयांचा नफा मिळवून देण्याचा आरोप आहे. या प्रक्रिये दरम्यान इतक्या रकमेचे परवाना शुल्क माफ केले गेले, ज्यामुळे सरकारचे नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. शिवाय, उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली ‘लीक’ करुन देण्यात आली, असा आरोपही त्यांच्यावर असून दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा सीबीआयने केला.
दिल्ली सरकारने व्यापाऱ्यांना फायदा होईल आणि सरकारला नुकसान होईल, असे मद्य धोरण बनवले. त्यासाठी दबाव आणला, असा आरोप उत्पादन शुल्क विभागाच्या एका आयएएस अधिकाऱ्याने केला होता. त्या आरोपासंदर्भात सिसोदिया यांची आज चौकशी करून त्यांना काल अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने सिसोदिया यांना आज सिटी कोर्टात हजर केले होते. त्यावेळी सीबीआयने मनीष सिसोदिया यांची पाच दिवसांची कोठडी न्यायालयात मागितली होती. दरम्यान न्यायालयाने सिसोदिया यांना पाच दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता ते 4 मार्चपर्यंत सीबीआयच्या ताब्यात राहतील.
Eknath Shinde :मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांनी हात देऊन सावरले
[BREAKING] Delhi court remands Manish Sisodia to CBI custody till March 4
report by @prashantjha996 #ManishSisodia #ManishSisodiaArrested @msisodia https://t.co/5CzaqOuP8z
— Bar and Bench (@barandbench) February 27, 2023
सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहे. नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयाचा घेराव करू, असे आपने म्हटले आहे.