Download App

तिरुमला उद्योग समूहाच्या प्रमुखांचा पाय आणखी खोलात; सुरेश कुटेंसह एकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी

Suresh Kute यांना त्यांच्या पत्नी आणि आशिष पाटोदेकर या तिघांना देखील 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dnyanradha Multistate Suresh and Archana Kute Arrest : तिरुमला उद्योग समूहाचे (Tirumala Udyog Group) प्रमुख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट ( Dnyanradha Multistate ) या पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता अखेर सुरेश कुटे ( Suresh Kute ) यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि कार्यकारी संचालिका अर्चना कुटे त्याचबरोबर संचालक आशिष पाटोदेकर जे कुटे यांचे भाचे आहेत. यांना पोलिसांनी अगोदर चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यात सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर जे कुटे यांचे भाचे आहेत. यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट या पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याविरोधात ठेवीदारांनी तक्रार दाखल केली होती. जास्त व्याजदराचे आमिष दाखवून 74 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार माजलगाव शहरातील तब्बल 17 ठेवीदारांनी दाखल केली होती. त्यामध्ये कुटे यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कुटे यांच्यासह त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ओडिशात भाजपचा ऐतिहासिक विजय, मुख्यमंत्री पदांसाठी ‘हे’ नाव चर्चेत

दरम्यान ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये 6 लाख 50 हजार ठेवीदारांचे 3 हजार कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार प्रचंड आर्थिक तणावात आहेत. तात्पुरती गरज भागवावी म्हणून लोकांकडून घेतलेले देणे परत करताना ठेवीदारांच्या नाकीनऊ आले आहे. मात्र, सुरेश कुटे यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तुम्ही माझ्या बँकेतून पैसे काढणार आहात आणि दुसऱ्या बँकेत व्याजासाठी टाकणारच आहात तर माझ्याच बँकेत पैसे राहू द्या, असं म्हणून गरजवंत ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे ठेवीदार आक्रमक होत आहेत. मागील 9 महिन्यांपूर्वी कुटे यांनी दिलेल्या चेकच्या तारखा संपत आल्याने ठेवीदार आता बँकेत चेक टाकणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ज्ञानराधाच्या 51पैकी 26 शाखा बंद आहेत.

आमचेच काही लोक बरळल्याने आमचा पराभव… ‘या’ भाजप नेत्याचा घरचा आहेर

तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरेश कुटे यांना दुपारी 2 वाजेपर्यंत ज्ञानराधा बँकेच्या घोटाळ्यासंबंधीचे दस्तऐवज सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार कुटे यांना ठेवीदारांच्या ठेवी कसे परत करणार? आरबीआय सोबत झालेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्रे पोलिसांना सादर करायची सांगितली आहेत.

follow us

वेब स्टोरीज