अहिल्यानगरमध्ये घोडेपीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न; आरोपी अन् जेसीबी पोलिसांच्या ताब्यात

Attempt to demolish Ghodepir Dargah in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात (Crime News) आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी (demolish Ghodepir Dargah) तीनही आरोपीसह जेसीबी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
पोलीस बंदोबस्तात वाढ
मागील दोन दिवसांपासून दोन गटांत या दर्ग्यावरून मतभेद होता. आज पहाटे काही समाजकंटकांनी दर्ग्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार आज पहाटेपासूनच या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. (Police Custody) दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी समाजकंटक असे प्रकार करत असल्याचे सांगितले जात आहे.
ब्रेकिंग! टीम इंडियाची भिंत कोसळली, चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती; 20 वर्षांची कारकिर्द
अज्ञात समाजकंटकांचा कारनामा
नगर शहरातील पटवर्धन चौक ते गांधी मैदान रोडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेली पुरातन घोडेपीर दर्गा अज्ञात समाजकंटकांनी जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. पहाटे तीनच्या सुमारास घटना घडली आहे. ही घटना समजल्यानंतर तोफखाना, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि प्रताप दराडे यांच्यासह शहराचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्गे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थळाची पाहणी केली.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने पाडलेल्या दर्ग्याचे अवशेष पोलीस आणि महापालिका प्रशासनाने त्वरित उचलून नेले. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. घोडेपीर या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात येत असत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या दर्ग्याकडे पाहिले जायचे. मात्र, ही दर्गा पाडल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.