Download App

Uday Samant : उष्माघात प्रकरणाचं राजकीय भांडवल करु नका…

वातावरण बदलामुळे पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला, याचं कुणीही राजकीय भांडवल करु नये, या शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मंत्री उदय सामंत यांनी उष्माघातावर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडलीय.

“विचारधारेवर काम करणाऱ्या सर्वच लोकांच…” अजित दादाच्या प्रश्नांवर बावनकुळे म्हणतात…

पुढे बोलताना ते उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम सुरु असताना अचानक वातावरण बदल झाला. अचानक झालेल्या बदलामुळे ऊन वाढलं होतं. त्यानंतर उन्हाचा फटका कार्यक्रमात आलेल्या नागरिकांना फटका बसल्याने एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं.

पुढची काय गणितं आहेत माहीत नाही; श्रद्धांजली सभेत गौरव बापटांचे सूचक विधान!

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Heat Stroke : श्रीसदस्यांची विचारपूससाठी राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाणार

याचदरम्यान काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याने सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सोहळ्याला उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले होते. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे काल रात्री आठच्या सुमारास आले होते.

मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Tags

follow us