पुढची काय गणितं आहेत माहीत नाही; श्रद्धांजली सभेत गौरव बापटांचे सूचक विधान!
Gaurav Bapat : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल सर्वपक्षीय सभा घेण्यात आली. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पुण्याचे पालकमंत्री व भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील, मनसे नेते बाला नांदगांवकर, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांनी गिरीश बापटांच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच या श्रद्धांजली सभेसाठी गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट व त्यांची सून स्वरदा बापट हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी गौरव बापट यांनी केलेल्या केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी त्यांच्या भाषणावेळी एक सूचक वक्तव्य केले आहे. पक्षाच्या ऋणात रहायला आवडेल, पक्षाच्या नेत्यांच्या ऋणात रहायला आवडेल. त्यामुळे सर्वांचं मार्गदर्शन, प्रेम असू द्या. असे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा इतिहास अन् मानकरी
तसेच पुढची काय गणितं आहेत माहीत नाही. त्यामुळे पुढील काळात आम्हाला मार्गदर्शन करा, साथ द्या, या त्यांच्या वक्तव्याने पुण्यातील सर्व राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात गौरव बापट काही वेगळा निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी त्यांनी आपले वडील गिरीश बापट यांच्या आठवणीदेखील ताज्या केल्या. बाबा आतापर्यंत उथळ आयुष्य कधी जगलेचं नाही. त्यामुळे नुसतं ऋणनिर्देश कसे मानायचे असा माझ्यापुढे प्रश्न आहे. ते सामान्य माणसापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत मिळून मिसळून राहायचे. कधी- कधी वाटायचं की ते खरंच आमदार आहेत का? असे म्हणत त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
ठाकरे-पवारांसमोरच जयंत पाटलांचे सूचक विधान! म्हणाले… कुछ तो मजबुरीया…!
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कसब्याची पोटनिवडणुक झाली होती. त्यावेळी गिरीश बापट यांनी पक्षाकडे त्यांच्या सून स्वरदा बापट यांना उमेदवारी मागितल्याची चर्चा होती. पण त्यावेळी पक्षाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तसेच आता गिरीश बापट यांच्या जागेवर पुण्याच्या लोकसभेची पोटनिवडणुक होणार आहे. यावेळी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, जगदीश मुळीक, स्वरदा बापट या चार नावांची लोकसभेसाठी चर्चा सुरु आहे.