‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागेल असे वाटत नाही’, Sharad Pawar यांचे वक्तव्य

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP  अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar )  यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एमपीएससी ( MPSC )  करणारे विद्यार्थी शरद पवारांना भेटायला आले होते. त्यावेळी पवारांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (77)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (77)

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP  अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar )  यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एमपीएससी ( MPSC )  करणारे विद्यार्थी शरद पवारांना भेटायला आले होते. त्यावेळी पवारांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले.

उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले तर मध्यावधी निवडणूक लागू शकते, असे विधान केले होते. त्यावर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. मला असे वाटत नाही. राज्यामध्ये मध्यावधी निवडणूक लागेल अशी स्थिती सध्या राज्यात नाही, असे पवारांनी म्हटले आहे.

(उस्मान हिरोलींच्या आवाहनात चुकीचं काय? शरद पवारांनी केली पाठराखण)

यावेळी त्यांना महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर बोलताना पवार म्हणाले, आम्ही अजून चर्चेला सुरुवात देखील केली नाही. त्यांचा परफॉर्मन्स काय आहे?, आमचा परफॉर्मन्स काय आहे? ते देखील आम्ही पाहिले नाही. त्यामुळे आत्ताच हा वाद काढू नका, असे पवार म्हणाले.

दरम्यान गेल्या काही दिवासांपासून पुण्यामध्ये एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यांच्या मागण्या मान्य होण्यसाठी शरद पवारांनी त्या विद्यार्थ्यांची मध्यरात्री भेट घेतली होती. त्यामुळे विद्यार्थी आज त्यांना धन्यवाद देण्यासाठी आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

Exit mobile version