उस्मान हिरोलींच्या आवाहनात चुकीचं काय? शरद पवारांनी केली पाठराखण

उस्मान हिरोलींच्या आवाहनात चुकीचं काय? शरद पवारांनी केली पाठराखण

मुंबई : बाहेर गेलेल्या मतदारांना बोलवणे, त्यांना आवाहन करणं यामध्ये चुकीचं काय? उस्मान हिरोली यांनी फक्त बाहेर गेलेल्या मतदारांना बोलवण्याबाबत वक्तव्य केल्याचं राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पवार उस्मान हिरोलीची पाठराखण करीत असल्याचं दिसून आलं आहे. शरद पवार यांची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी नूकतंच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत संघ आणि मोदींना हरवण्यासाठी जेवढे लोकं दुबई किंवा सौदीला गेले आहेत त्यांना बोलवावं, हवं तर मेलेल्यांना हजर करा, असं आवाहन हिरोली यांच्याकडून बैठकीत करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या बैठकीला शरद पवारही हजर होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी उस्मान हिरोलींची पाठराखण केलीय.

संजय राऊत यांचं नाव ‘संजय आगलावे’ असं करा, शहाजीबापू पाटील यांचा टोला

उस्मान हिरोली यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा व्हिडिओ ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. उपाध्ये ट्विटमध्ये म्हणाले, काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे हे वक्तव्य म्हणजे बोगस मतदान घडविण्याची योजना आखली जात असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केलाय.

..म्हणून ठाकरे गटाच्या माजी आमदाराचं संचालक पद गेलं

काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीही त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाचं समाचार घेतला आहे. कसबा पेठ मतदारसंघ हिंदुत्ववादी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधकांकडून कितीही नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचा आमदार निवडून येणार नसल्याचा दावा देखील फडणवीसांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube