संजय राऊत यांचं नाव ‘संजय आगलावे’ असं करा, शहाजीबापू पाटील यांचा टोला

  • Written By: Published:
Shahajibapu

“संजय राऊत यांनी महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी आग लावण्याचं काम केली आहेत, त्यामुळे त्यांची नाव संजय राऊत यांनी संजय आगलावे असं करा” असा खोचक टोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केलं.

यावेळी शहाजीबापू यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “संजय राऊत हे महाराष्ट्रभर आग लावत फिरलेले आहेत. त्यामुळे त्यांचं आडनाव बदलून संजय आगलावे असं नामकरण करा” अशी टीका त्यांनी केली. श्रीकांत शिंदे हे राज्यातील सामाजिक काम करणारे तरुण, तडफदार युवा खासदार आहे, त्यांच्यावर असे आरोप करणे संजय राऊत यांना शोभत नाही. असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा :  Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?

संजय राऊत मातोश्रीचे एकनिष्ठ नाहीत

संजय राऊत कधीच मातोश्रीशी एकनिष्ठ नव्हते. त्यांनी मातोश्रीचं राजकारण उद्धस्त करण्याची सुपारी घेतली आहे. अशी टीकाही शहाजीबापू यांनी राऊत यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यभर वाढणार आहे, ती वाढवण्यासाठी आम्ही काम करणार आहोंत. असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

https://www.youtube.com/watch?v=NJSTBYe66R4

Tags

follow us