bring a big leader home to Congress : कळमनुरी मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी पुन्हा घरवापसी करावी, म्हणजेच पुन्हा काँग्रेसमध्ये(Congress) प्रवेश करावेत म्हणून जोरदार प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. डॉ. टारफे(Dr. Santosh Tarafe) यांच्यासारख्या उच्च शिक्षित, मोठं संघठन कौशल्य असलेल्या नेत्याला पक्षात घेतल्यास पक्षाला अच्छे दिन येतील. यासाठी पक्षातील बेड नेते प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा डॉ. संतोष टारफे यांनी निवडणूक लढवली आहे. सुरवातीला 25 हजार 893 मते त्यांनी मिळवली होती नंतर 2014 मध्ये 67 हजार 104 मते घेऊन कॉग्रेस पक्षाकडून विजय प्राप्त केला होता नंतर कै. राजीव सातव यांच्या निधनानंतर बदलत्या राजकीय घडामोडीमुळे त्यांनी कॉग्रेस सोडून उबाठा शिवसेना पक्षात प्रवेश करून 2024 ची विधानसभा निवडणुक लढवली आणि तब्बल 93 हजार मतं मिळवली होती. मात्र तरी देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान मागील काही दिवसात अचानक कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वरच्या पातळीवर राजकीय घडामोडी घडून कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आ. डॉ. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
Video : युती ठाकरे बंधूंची पण, मानाचं पानं राऊतांना; सुरूवात ते शेवट पत्रकार परिषदेत काय घडलं?
सातव यांनी पक्षातंर केल्यानंतर अधिच कमकुवत झालेल्या कॉग्रेसला मतदारसंघात व जिल्ह्यात मोठा राजकीय झटका बसला आहे. यातून पक्षाला सावरण्यासाठी व पक्षाला शहरी तसेच ग्रामीण भागात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी डॉ. संतोष टारफे यांच्यासारख्या उच्च शिक्षीत तथा संघटन कौशल्य व स्वतः चे मोठ्या प्रमाणात समर्थक असलेलं नेतृत्व पुन्हा कॉग्रेस पक्षात याव म्हणून वरीष्ठ पातळीवरूनही प्रयत्न होत आसल्याची चर्चा एकावयास मिळत आहे. दुसरीकडे काही मोठ्या नेत्यांनी डॉक्टर टारफे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अगामी काही दिवसात कळमनुरी मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात अस राजकीय हालचाली, गाठीभेटी यातून दिसून येत आहे. डॉ. टारफे यांनी जर खरच घरवापसी केली तर अगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आधी कॉग्रेसला मोठा जनाधार मिळू शकतो. याबाबत माजी आ.डॉ. संतोष टारफे समर्थकही त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लाउन बसले आहेत.
