वादळी वाऱ्याने टोलनाक्याचे शेड थेट रस्त्यावर, महामार्गावरील वाहतूक ठप्प

तालुक्‍यात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले आहेत. वारा इतका जोराचा होता की, बडेवाडी शिवारातील हायवेवरील टोलनाक्याचे छत रस्त्यावर कोसळले आहे. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तासानंतर वाहतूक मोकळी करून देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाल्याने लोक बेघर झाले आहेत. येळी, खरवंडी, रांजणी,पाथर्डी, कोरडगाव, फुंदेटाकळी भागात घरे व आंब्यांचे मोठे […]

WhatsApp Image 2023 06 05 At 9.14.31 AM

WhatsApp Image 2023 06 05 At 9.14.31 AM

तालुक्‍यात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले आहेत. वारा इतका जोराचा होता की, बडेवाडी शिवारातील हायवेवरील टोलनाक्याचे छत रस्त्यावर कोसळले आहे. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तासानंतर वाहतूक मोकळी करून देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाल्याने लोक बेघर झाले आहेत. येळी, खरवंडी, रांजणी,पाथर्डी, कोरडगाव, फुंदेटाकळी भागात घरे व आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

फळबागातील आंब्यांची झाडे मोडून कैऱ्या जमिनीवर पडल्या आहेत. तालुक्‍यात रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक जोराचा वारा वाहू लागला. सुरुवातील वार्‍यामुळे पाऊस येतो, अशी भावना सुख देणारी वाटली.मात्र, केवळ पाच ते दहा मिनिटांचा जोराचा वारा वादळी वारा बनला. वारा इतका जोराचा होता की, बावळटीमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी (येळी) शिवारातील टोलनाक्याचे लोखंडी छत रस्त्यावर कोसळले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या वस्त्यांवरील राहत्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. रांजणी, येळी, मोहोजदेवढे, टाकळीमानूर खरवंडी, कोरडगाव , पाथर्डी शहर, अशा विविध ठिकाणी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसाची वाट पाहणारा बळीराजा पुन्हा एकदा घरावरील पत्रे उडाल्याने बेघर झाला आहे. वाऱ्यामुळे घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार शाम वाडकर यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version