Download App

भगत पाटील यांना ईडीची नोटीस; भावासह जयंत पाटलांचे 6 निकटवर्तीय रडारवर

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) :

मुंबई  : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याची माहिती समोर येत आहे. गत शुक्रवारीच (11 ऑगस्ट) त्यांना ईडीने ही नोटीस पाठविली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. याशिवाय अन्य 5 जणांनाही ईडी चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहिती आहे. भगत पाटील हे मुंबईत हॉटेल व्यावसायिक आहेत. (ED notice to Jaysing Patil, brother of NCP’s Sharad Pawar group state president Jayant Patil)

जयंत पाटील सध्या कथित आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. यापूर्वी या प्रकरणात तब्बल 9 तास त्यांची चौकशी देखील झाली आहे. यानंतर आता जयंत पाटील यांचे निकटवर्तीय देखील ईडीच्या रडारवर आल्याचे सांगितले जात आहे. यात सध्याच्या घडीला त्यांचे बंधू भगत पाटील यांना नोटीस आली आहे.

शरद पवार अन् अजितदादांच्या गुप्त भेटीत काय खलबतं? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नेमकं कारण

याबाबत बोलताना जयंत पाटील काय म्हणाले?

या नोटिसीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधूंना ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीसंदर्भात त्यांना माहिती विचारण्यात आली आहे. एका कंपनीच्या बाबतीत साक्ष म्हणून त्यांना बोलवण्यात आलेआणि ते चार दिवसांपूर्वीच जाऊन आले, असाही खुलासा पाटील यांनी केला.

सर्वांनी सोबत यावं, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद : दिल्लीचा निरोप घेऊन झाली काका-पुतण्याची भेट?

अजित पवार-शरद पवार भेटीचा आणि जयंत पाटलांच्या बंधूंना आलेल्या ईडी नोटिसीचा काही संबंध आहे का? असे विचारला असता जयंत पाटील म्हणाले. त्याचा आणि बैठकीचा काही संबंध नाही. कोण- कोणाला भेटलं यावर कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम असण्याची गरज नाही, लोक-लोकांना भेटत असतात. त्यामुळे याबद्दल विशेष सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us