Eknath Khadse First Reaction : आमचे जावई दोषी असतील तर मी त्यांचं समर्थक करणार नाही. पण हे सर्व घडतंय की, घडवलं जातंय? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. जावयाला पुण्यात रेव्ह पार्टीत अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक (Rave Party Pune) करण्यात आली आहे. ते रोहिणी खडसे यांचे (Rohini Khadse) पती आहेत.
एकनाथ खडसे यांनी काय म्हटलं?
माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलंय की, गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे, त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं, याचा थोडा-थोडा अंदाज मला होता. याच्यात काहीजण अत्यंत मोठ्या अडचणीत आहेत, ते आता अंतिम टप्प्यामध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी काही फारसं त्यावर बोलणार नाही. परंतु अलीकडे पुण्यात ज्या काही घटना घडल्या आहेत. प्रांजल यांच्यासोबत जे घडलं, ते फक्त मी चॅनेलवर पाहिलं आहे. माझं प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं होवू शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर ती खरी रेव्ह पार्टी असेल, या पार्टीत आमचे जावई खरे गुन्हेगार असतील, तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी याठिकाणी अपेक्षा आहे.
फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट
पोलीस काहीही करू शकतात, ही भावना जनमाणसांत आहे. यासंदर्भात नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे. ब्लड रिपोर्ट आले पाहिजे, सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं चुकीचं होईल. सर्व रिपोर्ट आल्यानंतर मी पत्रकार परिषद घेईल. याप्रकरणात जावई असो किंवा इतर कोणी असो, गुन्हेगार असेल तर शासन झालं
पाहिजे, पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते सहन केलं जाणार नाही. निश्चितपणे आम्ही विरोध करू.
हरिद्वार हादरलं! मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 6 वर
फ्लॅटवर छापा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीनंतर खराडीतील एका लॉजमधील फ्लॅटवर छापा टाकला. तिथे रेव्ह पार्टी हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू होती. फ्लॅटमधून कोकेन, एलएसडी, हुक्का, मद्याच्या बाटल्या आणि पार्टीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 2 महिला आणि 5 पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.