अजितदादा मनाने निर्मळ होते, मोठा भाऊ हरपल्याची मनात भावना; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत एका विमान अपघातात मुत्यू झालं आहे. या घटनेनं राज्यात

Eknath Shinde On Ajit Pawar Death

Eknath Shinde On Ajit Pawar Death

Eknath Shinde On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत एका विमान अपघातात मुत्यू झालं आहे. या घटनेनं राज्यात शोककळा पसरली आहे. अजितदादा मनाने निर्मळ होते. मोठा भाऊ हरपल्याची मनात भावना आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की,  मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक टीम म्हणून काम केलं आहे. अजित पवार पहाटे लवकर कामाला सुरुवात करत होते. काल- परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. वेळेचं भान ठेवणारा नेता महाराष्ट्राने गमावला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच अजितदादा मनाने निर्मळ होते. त्यांच्या जाण्याचे मोठा भाऊ गेल्याची भावना आहे असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

नेमकी घटना काय?

आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये जाहीर सभा घेण्यासााठी जात होते. या सभेसाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीच्या दिशेने निघाले होते. मात्र लँडिंगच्या 45 सेकंदापूर्वी विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला आणि विमान शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, विमान जळून खाक, फोटो समोर

Exit mobile version