मुंबई : लोकसभेनंतर अजित पवारांचे (Ajit Pawar) अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिरसाटांनी रोहित पवारांचा एकेरी उल्लेख करत सध्या तो रोहित हवामान विभागासारखे त्याचे अंदाज बांधत असल्याचेही शिरसाट म्हणाले.
ओठांना लिपस्टिक अन् हातात बांगड्या; पोलीसही हैराण, आत्महत्येपूर्वी अधिकारी का बनला महिला?
शिरसाट म्हणाले की, हवामान खात्याने मुंबई मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. पण पडला का मुंबईत पाऊस? असा प्रतिप्रश्न शिरसाटांनी उपस्थित केला. तसचं रोहित पवारचं आहे. एखादी बातमी सोडून द्यायची आणि कशी चलबिचल होईल अधिवेशनानंतर कशी घरवापसी होईल? या सर्व कल्पानांचा भडीमारा मीडियाच्या माध्यमातून रोहित पवार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, असं काही होणार नसून, अजितदादांचे सर्व आमदार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे शिरसांटांनी सांगितलं.
Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
आघाडीत बिघाडी पण…
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, महायुतीत सर्व एकत्र निर्णय घेतले जाणार असून, आघाडीत बिघाडी झालीय. मात्र आम्ही एकसंघ लढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस आघाडीत १ नंबर पक्ष झालाय आहे असेही शिरसाट म्हणाले. राजकारणासाठी मराठी माणूस आठवतो. मात्र, निवडणुका संपल्यावर कोण मराठी माणूस ही दुटप्पी भूमिका योग्य नसल्याचा टोला शिरसाटांनी ठाकरे गटाला नाव न घेता लगवला. मराठी माणसाची अपेक्षा पूर्ण करण्याचे स्वप्न महायुती करेल.दोन दिवसांपासून अनेक नेते दिल्लीला गेले तेथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभेसाठी शिंदेंनी केंद्रीय मंत्र्यांसमोर अधिकच्या जागा मागितल्या असतील तर ही काही चूक नाही, प्रत्येक जण आपली गणित मांडत असतो असे ते म्हणाले.