Eknath Shinde on Rajan Salavi Entered in Shivsena : राजन साळवी यावेळी देखील ते आमदार झाले असते. मात्र ते शिवसेनेमध्ये नव्हते. पण काही गोष्टी योगाच्या असतात. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी शिंदे बोलत होते.
अयुष्मान खुराना WPL 2025 च्या उद्घाटन सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्ससाठी सज्ज
यावेळी शिंदे म्हणाले की, मी राजन साळवींच शिवसेनेमध्ये स्वागत करतो. ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते. जिल्हाप्रमुख, उपनेते तीन वेळा आमदार होते. अशी अनेक पद त्यांनी भूषविली. यावेळी देखील ते आमदार झाले असते. मात्र ते शिवसेनेमध्ये नव्हते. उदय आणि किरण सामंत मला सारखं सांगत होते. त्यांना शिवसेनेत बोलवा आणि त्यांना तिकीट द्या. दुसरीकडे किरण स्वत: आमदार होऊ शकत असताना देखील तो ही मागणी करत होता. पण काही गोष्टी योगाच्या असतात. असंही यावेळी शिंदे म्हणाले.
शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका, आदित्य ठाकरेंनी दिली तंबी
गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नारााज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता ठाकरे गटाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यामध्ये आज 13 फेब्रुवारीला दुपारी वाजता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या पक्षप्रवेशानंतर कोकणात काय समीकरणं बदलू शकतात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गौतम अदानींना पुन्हा धक्का, चक्क 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून कंपनीची माघार, ‘हे’ आहे कारण
लांझा, राजापूर आणि साकरता या भागामध्ये या विधानसभा मतदारसंघाच राजन साळवी यांनी जवळपास तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी ते हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दी सुरू केली आहे. त्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते मुळचे रत्नागिरीचे आहेत. मात्र त्यांनी कोकणात प्रभावी काम केले आहे. त्यामुळे शिंदेना हे सर्व तळागळातील कार्यकर्ते मिळाले आहेत.