शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका, आदित्य ठाकरेंनी दिली तंबी

शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका, आदित्य ठाकरेंनी दिली तंबी

Aditya Thackeray Warns MP : महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या (Eknath Shinde) नेत्यांमध्ये सतत वाद सुरू आहे. दरम्यान, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज दिल्लीत पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संदेश दिला आणि सल्लाही दिला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला जाण्यास मनाई केलीय.

शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका. कुठेही जायचं असेल तर अगोदर पक्षाची परवानगी घ्या, अशी तंबी आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी खासदारांना पक्षाला माहिती न देता कोणत्याही जेवणाच्या किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका. एनडीए नेत्यांपासून, विशेषतः एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांपासून अंतर ठेवा, असं सुनावलं आहे. यासोबतच त्यांनी खासदारांना पक्ष शिस्तीचं पालन करण्यास सांगितले.

गौतम अदानींना पुन्हा धक्का, चक्क 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून कंपनीची माघार, ‘हे’ आहे कारण

आदित्य ठाकरे म्हणाले की, संसद अधिवेशनादरम्यान उद्धव गटातील सर्व खासदारांनी एकत्र राहावे आणि आपापसात समन्वय राखावा. खरंतर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सतत धक्के देत आहेत. पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे आता ठाकरे गटाच्या नेत्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत आहे.

शिंदे ठाकरेंच्या नेत्यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते ठाकरेंचा पक्ष कमकुवत करण्याच्या प्रयत्नात आहे. एकनाथ शिंदे राज्यात ऑपरेशन टायगर चालवत आहेत, त्याअंतर्गत अनेक यूबीटी नेते शिंदे यांच्या पक्षात सामील होऊ शकतात, अशी माहिती समोर येतेय. नुकतंच माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर साळवी आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे) सामील झालेत. साळवींचा राजीनामा कोकणात उद्धव गटासाठी मोठं नुकसान मानलं जातंय.

‘मला नातू हवाय…’ चिरंजीवीच्या विधानावर चाहत्यांचा संताप, खूपच भयानक विचार

शिंदे यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला. मीरा भाईंदरमध्ये उद्धव ठाकरे गटातील तीन माजी नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील झालेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगिरी खूपच खराब होती. राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला फक्त 20 जागा मिळाल्या होत्या. तर शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागा जिंकण्यात यश आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube