Eknath Shinde Reaction On Guardian Minister Post : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पर्यटन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलीय. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर (Guardian Minister) वक्तव्य केलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक विषयांवर चर्चा झाली. मुंबई आर्थिक राजधानी आहे. आज जिल्हा नियोजनाची बैठक पार पडली. तेव्हा अनेक आमदारांनी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे मुंबईतील रस्ते, उद्याने, त्याचबरोबर नवीन काही प्रकल्प आहेत, काही कोळीवाडे आहेत, त्यांचं डेव्हलपमेंट आहे. त्याचबरोबर मुंबईतील काही किल्ले आहेत. याचं रिस्टॉरेशन झालं पाहिजे, हॉस्पिटलमध्ये सुधारणा झाली पाहिजे. काही सामानाची आवश्यकता आहे, ते मिळाले पाहिजे अशा सर्व उपायांवर चर्चा झालीये.
आजच्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा झालीये. यासाठी आवश्यक तो निधी ठाणे आणि मुंबई शहरासाठी द्यावा, अशी मी मागणी केलीय. ठाणे जिल्हा देखील मोठा जिल्हा आहे. त्या भागात देखील अनेक प्रकल्प आहेत, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आहेत त्यांचं अपडेटेग्रेशन झालं पाहिजे. जे पर्यटन स्थळं आहेत, त्यांचं डेव्हटलपमेंट झालं पाहिजे. या सर्वांवर जे पैसे आवश्यक आहेत, त्याची मागणी केलेली आहे. यामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.
बापरे! अख्खं कुटुंब पाच दिवस डिजीटल अरेस्ट; एफडी मोडली, कुटुंबाने गमावले 1.10 कोटी..
आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. रायगडच्या जिल्हा नियोजनासंदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्याचा वाद देखील लवकरच मिटेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आमदारांनी त्यांच्या भागातील ज्या सूचना असतील, त्या द्याव्यात. त्यांचंही आम्ही अंतर्भाव बजेटमध्ये करू. शहाजीराजांच्या स्मारकाची दुरावस्था झाली आहे, याची जबाबदारी शासनाची आहे. शासन पूर्णपणे ती बाब गांभीर्याने घेत आहेत. आपत्ती व्यवस्थापन समिती कधी झाली? हे मला माहित नाही. पण जिथे आपत्ती येते, संकट येते तिथे एकनाथ शिंदे उपस्थित असतो, असं ते म्हणालेत.
मला पुरस्कार देण्याचं ठरवलं आहे. महापराक्रमी महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा झेंडा फडकवण्याचं काम केलंय. असा पुरस्कार मला दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असं एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.