अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Eknath Shinde Speak On Riot : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यातील दोन तालुक्यात पुन्हा एकदा जातीय दंगल झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच दंगलीच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस पाऊले उचलली आहे. तसेच या दंगलीतील दोषींवर कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. […]

Untitled Design (2)

Untitled Design (2)

Eknath Shinde Speak On Riot : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यातील दोन तालुक्यात पुन्हा एकदा जातीय दंगल झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच दंगलीच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस पाऊले उचलली आहे. तसेच या दंगलीतील दोषींवर कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

‘फडणवीस यांच्यामुळे बीपी वाढतो किंवा कमी तरी होतो…’

कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने टाका, आपण केलेल्या पोस्टमुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

Exit mobile version