Shivsena CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी आणि मग गोव्यामार्गे मुंबई असा सत्तासंघर्षाचा प्रवास आजही नागरिकांच्या चांगलाच लक्षात आहे. त्यानिमित्त आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ठाण्यामध्ये एका कार्यक्रमात वर्षभराचा आढावा घेणारं भाषण केलं. ( Eknath shinde speech on a year complet of shinde fadanvis goernment)
गुंडांकडून जमिनींवर जबरदस्तीने ताबा; शिवसेनेसह राष्ट्रवादी आक्रमक
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेला वाचवलं त्यावेळी काही जण सोबत होते तर काही जण म्हणत होते. तो प्रसंग बाका होता. एकनाथ शिंदेचं काय होणार? मात्र फडणवीसांनी पाठिंबा दिला आणि आम्ही सरकार स्थापन केलं. गेल्या वर्षभरात आम्ही कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही असे जनहिताचे निर्णय घेतले. सरकार आपल्या दारी, आरोग्य, रस्ते, शिक्षण, पायाभूत सुविधा यांच्या विविध योजना आम्ही सुरू केल्या. तसेच त्यांनी सरकारचे विविध कामं यावेळी सांगितले. तसेच सर्वांना सरकारच्या वर्षपूर्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Rahul Gandhi In Manipur: राहुल गांधींनी मणिपूरमध्ये उघडले ‘मोहब्बत की दुकान’, पाहा फोटो
वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेकडून खास व्हिडीओ जारी :
दरम्यान या सरकारच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने शिंदे गटाकडून खास व्हिडीओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिंदे गटाने आपलं अधिकृत सोशल मीडिया खातं लाँच केलं. हा व्हिडीओ याच सोशल मीडिया अकाऊंटवरुन लाँच करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना..असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच आशीर्वाद शिवछत्रपतींचे, एक वर्ष सुराज्याचे.., असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये गेल्या वर्षभरात कोण-कोणत्या घटना घडल्या त्याचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गेल्या वर्षभरात कसे काम केलं, यासह त्यांच्यावर झालेली टीका, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील वाक्य याचा आवाजदेखील या व्हिडीओला देण्यात आला आहे.