Download App

संयोगीताराजे प्रकरणात संभाजीराजेंची एन्ट्री

कोल्हापूर : नाशिकच्या (Nashik)काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Temple)वेदोक्त मंत्र (Vedokt Mantra)म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांच्या पत्नी संयोगीताराजे (Sanyogitaraje)यांनी केला. त्याबद्दल संयोगीताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट (Instagram post)लिहिली आहे. त्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. त्यातच आता संभाजीराजे छत्रपती यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur)झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, संयोगीताराजे या सत्याची बाजू घेऊन बोलतात. जे पटले नाही, ते परखडपणे सांगतात. नाशिकमध्ये त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या परखडपणे बोलण्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रीया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

Mallikarjun Kharge : भाजप कमकुवत होत असल्यानेच दंगली भडकवल्या जात आहेत

महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे राज्य आहे. या महाराष्ट्रात अशी कृत्य करणारे लोक का निर्माण होतात? ते कळत नाही. प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे. 100 वर्षांपूर्वी जो त्रास शाहू महाराज आणि इतर महापुरुषांना झाला, तोच प्रकार पुन्हा सुरु झाला आहे, अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत, असेही यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

काळाराम मंदिर परिसरामध्ये पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा महंत सुधीरदास यांनी खुलासा केला. त्यांनी सांगितले की, संयोगीताराजे यांनी आता पोस्ट केली आहे, पण त्या जवळजवळ पावणेदोन महिने झाले, यावेळी त्या नाशिकला आल्या होत्या. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा करण्यात आला. संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी संयोगीताराजे छत्रपती या काळाराम मंदिरात आल्या होत्या. या दिवशी त्यांनी मंदिरात काळारामाचे दर्शन घेत पूजा देखील केली. परंतु यामध्ये पुजारी किंवा मंदिर प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीनं चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं सुधीरदास म्हणाले.

याबद्दल संयोगीताराजे छत्रपती यांनी मंदिर पुजाऱ्याने वैदिक पद्धतीने पूजा करण्यास नकार दिल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावर महंत सुधीरदास म्हणाले की, पुरोणोक्त या शब्दाला त्यांचा आक्षेप होता, मात्र आम्ही त्यांना काळाराम मंदिर परिसर दाखवत प्रसाद दिला. त्यासह 11 हजार रुपये दक्षिणाही दिली. राजेंच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती. अधिकार वगैरे मी असं कुठलंही वाक्य बोललेलो नाही, तरीदेखील आम्ही कोल्हापूरला जाऊन त्यांची भेट घेऊ, असंही सुधीरदास म्हणाले.

Tags

follow us