Mallikarjun Kharge : भाजप कमकुवत होत असल्यानेच दंगली भडकवल्या जात आहेत
मागील आठवड्यात सुरु झालेल्या रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये झालेला दंगलीचा राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनीही आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की भाजप कमकुवत होत असल्याचे लक्षात येताच दंगली भडकवल्या जात आहेत. आणि त्यातून जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
#WATCH | Delhi: When BJP realises it is getting weakened, then they incite riots and polarise people. It is the deed of BJP: Congress chief Mallikarjun Kharge on violence on Rama Navami pic.twitter.com/APIKRcaTib
— ANI (@ANI) April 3, 2023
रामनवमीच्या दिवसापासून पश्चिम बंगाल मध्ये सुरु झालेल्या दंगलीवरून सर्वच राजकीय पक्षाकडून भाजपला लक्ष केले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. बंगालमधील हिंसाचार भाजप प्रायोजित आहे. ज्या ठिकाणी निवडणुका जवळ येत आहेत आणि भाजपला आपले नुकसान होण्याची भीती आहे, तिथे दंगली होत आहेत. असा अप्रत्यक्ष आरोपच संजय राऊत यांनी केला आहे.
बिहारमध्येही भाजपाकडे इशारा
पश्चिम बंगाल सोबत बिहारमध्येही हिंसाचार चालू आहे. यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित शर्मा यांनीही भाजपावरच निशाणा साधला आहे. ते म्हणाले की आजकाल बिहारमध्ये जे काही घडत आहे, ते आपल्याला १९८९ च्या दंगलीची आठवण करून देत आहे. त्या दंगलीत किती लोकांचा जीव गेला? किती निष्पाप लोक मारले गेले, ज्यांना आजवर न्याय मिळाला नाही. बिहारमध्ये पुन्हा एकदा अशीच दंगल घडवण्याचा भाजपचा डाव आहे. त्याचा संबंध २०१४ आणि २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुकांशीही त्यांनी जोडला आहे.
यशोमती ठाकूर थेट गुजरात पोलिसांना भिडल्या…
दरम्यान पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. याशिवाय 5 एप्रिलपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सादर करण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत. हिंसाचाराच्या घटनांबाबत उच्च न्यायालयानेही पोलिसांना फटकारले आहे. त्यावर नियंत्रण का ठेवता आले नाही, कारण मिरवणूक त्यांच्या परवानगीनेच निघाली होती, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राज्यात रामनवमीच्या दिवशी हावडा आणि हुगळीत मिरवणुकीदरम्यान हिंसाचार झाला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी या हिंसाचाराची एनआयए चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. हिंसाचाराच्या वेळी बॉम्ब फेकण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यांनी या भागात केंद्रीय दले तैनात करण्याची मागणी केली आहे.