यशोमती ठाकूर थेट गुजरात पोलिसांना भिडल्या…

यशोमती ठाकूर थेट गुजरात पोलिसांना भिडल्या…

सूरत : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)समर्थनार्थ गुजरातला (Gujrat)जात असतांना महाराष्ट्रातील (Maharashtra) काँग्रेस नेते (Congress leader), आमदारांची वाहनं थांबवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group)आमदार सुरतला रवाना झाले होते, त्यावेळी अशीच चौकशी (Inquiry)केली होती का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यानंतर यशोमती ठाकूर यांच्या वाहनाला गुजरात पोलिसांनी (Gujrat Police)पुढे गुजरातला जाण्याची परवानगी दिली.

सुरतला रवाना झालेल्या यशोमती ठाकूर यांच्याही वाहनाची गुजरात पोलिसांनी अडवणूक केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी आक्रमकपणे जाब विचारल्यानंतर निःशब्द झालेल्या गुजरात पोलिसांनी पुढे सुरतच्या दिशेने जाण्याची यशोमती ठाकूर यांनी परवानगी दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, आमदार सुरतला रवाना झाले. यावेळी गुजरात पोलिसांकडून या आमदारांच्या वाहनांना थांबविण्यात आले. यात यशोमती ठाकूर यांनाही अडविण्यात आले. त्यावेळी गुजरात पोलिसांनी लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या दोन कॅमेराधारक कर्मचाऱ्यांना यशोमती ठाकूर यांच्यासमोर उभे केले. त्याचं थेट लाइव्ह प्रसारण गांधीनगरमध्ये होतंय. तिथं तुम्हांला पाहिलं जातं असल्याचं पोलिसांनी यशोमती ठाकूर यांना सांगितलं.

आम्ही आमच्या नेत्याला समर्थन देण्यासाठी जाऊ शकत नाही का? आमचा नेता गुजरातला आहे, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही जाऊ शकत नाही का? काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या वाहनास सूरतला जाऊ दिले.

Rahul Gandhi समर्थनासाठी जाणाऱ्या गाड्या गुजरात पोलिसांनी अडवल्या, संतापून यशोमती ठाकूर म्हणाल्या…

भारतासारख्या देशात जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ देण्यासाठी अशा पद्धतीची अरेरावी होत असेल तर, ही एकूणच गंभीर बाब आहे. राज्यातील सत्तांतरासाठी गुजरातने बंडखोर आमदारांना रेड कार्पेट टाकून सुरक्षा दिली. आज काँग्रेसच्या आमदारांना रोकटोक केली जात आहे, याचा निषेधही यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या वाहनाला दोन ठिकाणी थांबवण्यात आलं. माझं आयकार्ड तपासण्यात आलं. सत्तांतराच्या वेळेस शिंदे गटाच्या आमदारांना रेड कार्पेट टाकून संरक्षण देणारे हेच ते गुजरातचे पोलीस आहेत, जे आज राहुल गांधींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांची चौकशी करत आहेत.

आपण अशा कारवायांना घाबरत नाही. अशा पोलिसी कारवायांचा निषेध करते. तुम्हाला मला अटक करायची असेल तर करा, आपण घाबरत नाही. गप्प बसणार नाही. आमचं संभाषण थेट गांधीनगरला लाइव्ह चाललंय असं सांगण्यात आलं. तुम्ही गांधी नगरला लाइव्ह करा नाही तर पंतप्रधान कार्यालयाला लावा, तुम्ही आम्हाला रोखू शकणार नाही, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube