Rahul Gandhi समर्थनासाठी जाणाऱ्या गाड्या गुजरात पोलिसांनी अडवल्या, संतापून यशोमती ठाकूर म्हणाल्या…

  • Written By: Published:
Rahul Gandhi समर्थनासाठी जाणाऱ्या गाड्या गुजरात पोलिसांनी अडवल्या, संतापून यशोमती ठाकूर म्हणाल्या…

काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरात कोर्टात हजर राहणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनसाठी राज्यातील काही काँग्रेस नेते गुजरातला जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांचा गाड्या अडवल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी (Yashomati Thakur) केला आहे.

मानहानीच्या प्रकरणात (Defamation case) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नुकतेच लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. या शिक्षेविरोधात राहुल गांधी गुजरातमधील सुरत न्यायालयात (Surat Court) जाऊ शकतात. येथे ते आपल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करून न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. गांधींनी आपल्या याचिकेत ‘मोदी आडनाव’ प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकार्‍यांचा आदेश रद्द करण्याची मागणी करणार आहेत.

Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?

यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत देशातील अनेक काँग्रेस नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे, राज्यातील अनेक नेतेही आज त्यासाठी निघाले आहेत. यशोमती ठाकूर देखील यासाठी गुजरातला निघाल्या आहेत. त्यावेळी गुजरात मध्ये त्यांना अडवण्यात आल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहलं आहे की गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या गाडीला दोन ठिकाणी थांबवण्यात आलं. माझं आयकार्ड तपासण्यात आलं.

“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका

शिंदेच्या आमदारांना पायघड्या

याच ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेतील फुटीच्या वेळी गुजरात पोलिसांच्या कृतीवरही टीका केली आहे. त्यावर त्या पुढे म्हणाल्या की, “सत्तांतराच्या वेळेस शिंदे गटाच्या आमदारांना रेड कार्पेट टाकून संरक्षण देणारे हेच ते गुजरात चे पोलीस आहेत, जे आज राहुलजींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांची चौकशी करतायत. मी अशा पोलीसी कारवायांना घाबरत नाही. अशा पोलीसी कारवायांचा मी निषेध करते.”

याशिवाय त्यांनी तुम्हाला मला अटक करायची असेल तर करा मी घाबरत नाही. गप्प बसणार नाही. असं थेट आव्हान गुजरात पोलिसांना दिल आहे. ते म्हणाले की आमचं संभाषण थेट गांधीनगर ला लाइव्ह चाललंय असं सांगण्यात आलं. तुम्ही गांधी नगर ला लाइव्ह करा नाही तर पंतप्रधान कार्यालयाला. तुम्ही मला रोखू शकणार नाही.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube