Download App

निकालाच्या पूर्वसंध्येला फडणवीस, पवार आणि शिंदे एकत्र आल्याने वेगळीच चर्चा

  • Written By: Last Updated:

लातूर जिल्ह्यातील औसा येथे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अॅड परिक्षीत पवार यांचा देखील विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एहनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान सभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

कारण उद्या राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. या निकालाच्या पूर्वसंध्येला हे सर्व जण एकत्र आल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जर उद्याचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर शिंदे अपात्र होऊन हे सरकार पडेल आणि अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होतील का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

…तर राज्यात मोठ्या घडामोडी अन् राजकीय पडझड, असीम सरोदेंचं विधान

सामुदायिक विवाह सोहळ्यात राज्यभरातील 25 जोडपे विवाहबद्ध झाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी,शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील मुला – मुलींचे विवाह लावून आ. अभिमन्यू पवार यांनी मुलींचे कन्यादान केले. या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेसह केंद्र व राज्यातील मंत्री, खासदार, तसेच आध्यात्मिक गुरू उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एहनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान सभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वधूवरांना आशीर्वाद दिला तर त्यांनी यावेळी या विराट विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याबदला आमदार अभिमन्यू पवार यांचे कौतुक केले.

Tags

follow us