Download App

फडणवीस – आदित्य ठाकरेंची विधिमंडळात भेट, लिफ्टवरुन संवाद रंगला अन् …

Aaditya Thackeray Devendra Fadnavis Meet  : काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांची

Image Credit: letsupp

Aaditya Thackeray Devendra Fadnavis Meet  : काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांची शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी लिफ्टमध्ये भेट झाली होती. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.

तर आता पुन्हा एकदा विधानसभा लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट झाली आहे.

अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या लॉबीत अनेकवेळा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवाद रंगताना दिसत असतो. आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आपल्या कार्यालयातून बाहेर आले त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे अचानक एकमेकांच्या समोरासमोर आले.

तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना नमस्कार, काय चाललं आहे? असं विचारले त्यावर उत्तर देत आदित्य ठाकरे यांनी मिश्किलपणे मी लिफ्टमध्ये चाललोय असं म्हटले. त्यानंतर दोन्ही दोघांनी एकमेकांकडे पाहून जोरात हसले. मग दोन्ही नेत्यांमध्ये थोडी फार चर्चा झाली आणि त्यानंतर दोघेही निघून गेले.

तर यापूर्वी शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील विधानभवनात भेट झाली होती. विधानभवनाच्या लिफ्टसमोर त्यांची भेट झाली होती. त्यानंतर एकत्र चर्चा करून ते सभागृहात गेले होते. मात्र त्यापूर्वी तुम्ही दोघे सोबत छान दिसतात असं कोणीतरी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना पाहून म्हटलं होते.

त्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांनी लिफ्टमध्ये जात असताना ठाकरे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडे बोट दाखवत याला आधी बाहेर काढा,असं म्हटलं होते त्यावर उत्तर देत तुमचं अजून समाधान झालं नाही का? तुम्ही एकत्र प्रवास करणार असाल तर मी बाहेर पडतो. तुम्ही सोबत जा, असं उत्तर दरेकरांनी ठाकरे यांना दिला होता.

त्यानंतर ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करत महाविकास आघाडीला सोडणार नाही अशी माहिती दिली होती. तर आता फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेसमधून निवडून आल्याचा मला अभिमान…

follow us

वेब स्टोरीज