Sanjay Raut on Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील दोन आरोपींना आत ताब्यात घेण्यात आलं. पुण्यातून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून अजून एक आरोपी फरार आहे. (Sanjay Raut) याप्रकरणी योग्य तपास सुरू असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. तसंच, येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे बीडमधील देशमुख कुटुंबीय आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्य आरोपी तर आकाच; सुदर्शन घुले केवळ प्यादं, भाजप आमदार सुरेश धस यांचा हल्लाबोल सुरुच
संजय राऊत म्हणाले, ‘संतोष देशमुख हत्याप्रकरणावर रोज प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. हे प्रकरण पोलिसांच्या तपासात आहे, आणि न्यायप्रविष्ट आहे. ज्या दिवशी आपल्याला वाटेल योग्य दिशेने तपास केला जात नाहीय, तेव्हा आपण प्रश्न विचारू. पोलिसांनी आणि सीआयडीने केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवला पाहिजे. पोलीस तपासात बाधा येईल, असं काही करू नये.
ते पुढे म्हणाले, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. धस बोलत आहेत, ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा बीडमधील हा दहशतवाद मोडून काढायचा आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय तेव्हा आम्ही यावर नक्की बोलू असंही राऊत म्हणाले आहेत.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडचे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत. आम्ही वाट पाहत आहोत की पोलीस काय करणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.