मुख्य आरोपी तर आकाच; सुदर्शन घुले केवळ प्यादं, भाजप आमदार सुरेश धस यांचा हल्लाबोल सुरुच

मुख्य आरोपी तर आकाच; सुदर्शन घुले केवळ प्यादं, भाजप आमदार सुरेश धस यांचा हल्लाबोल सुरुच

Suresh Dhas on Sandosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे. बीड त्या प्रकरणातील (Suresh Dhas) आरोपी सुदर्शन घुले याच्या सह सुधीर सांगळे याला देखील बीड पोलिसांनी अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी तिघांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुदर्शन घुले हा केवळ प्यादं आहे, मुख्य आरोपी आका आहे असं म्हटलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला बेड्या; पुण्यातून अटक

काय म्हणाले सुरेश धस?

सुरेश धस म्हणाले, यातला एक आरोपी अद्याप फरार आहे, त्याचं नाव कृष्णा आंधळे तो पोरगा राहिला आहे आणि सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी नाही ते प्यादं आहे. त्याच्या पाठीमागचा मुख्य आरोपी हा कोण आहे, तो शोध पोलिसांनी शोधला पाहिजे. यातला मुख्य आरोपी हा आका आहे. या प्रकरणाचा मुख्य आरोपी आका आहे. मी ज्यांचा उल्लेख आका असा करतो ते आकाच मुख्य आरोपी आहे, बाकीचे प्यादी आहेत असंही धस म्हणालेत.

या सर्वांना सांगितलं जात असं करा तसं करा असं ते आहे, मुख्य आरोपी हा आका आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे, असं म्हणूनच नका. सुदर्शन घुले हा फक्त अंमलबजावणी करणारा आहे. परंतु हे जे आदेश दिलेले आहेत, खंडणीसाठी त्या कंपनीच्या साहेबांना उचलून आणा, तो हा प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे असं माझं मत आहे असेही पुढे धस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘एका आकाला अटक केली आहे, मग तो आकाच मुख्य आरोपी आहे, असेच म्हणतो आहे. दरम्यानच्या काळात आकाच्या आकाने फोनाफोनी केली असेल तर, आकाचे आका येतील ना. राहिलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करा, असंही सुरेश धस यांनी पुढे म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube