राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. (Thackeray) या पार्श्वभूमीवर आघाडी-युतीच्या चर्चा जोर धरू लागलेल्या असतानाच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही सुरू झालं आहे. त्यातच महाविकास आघाडी आणि मनसे अशी विरोधकांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. हे लोक इतके मोठे आहेत. त्यांनी किमान माहिती असलं पाहिजे की कुणाकडं कुठले अधिकार आहेत. काल या लोकांनी ज्यांची भेट घेतली त्या अधिकाऱ्यांकडं काहीच अधिकार नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते सोलापूर येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले इतके कन्फ्यूज विरोधक मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाहीत. इतके मोठे -मोठे लोक त्यांना कोणाकडं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे? कायदा काय आहे? हे देखील माहिती आहे की नाही असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांची चांगलीच खिल्ली उडवली. त्याचबरोबर, यांना सगळ माहिती असतानाही केवळ आपण निवडणूक हारलो तर? यासाठी ते आधीच कारणं शोधून ठेवत आहेत, असा खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
आम्ही कसलीही हुकूमशाही मान्य करणार नाही; राज्य निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे आक्रमक
विरोधक काल राज्यात जे निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेले होते. पण ते ज्या अधिकाऱ्यांकडे गेले होते, त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काहीच नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा वेगळा कायदा आहे. त्यातून स्टॅट्यूटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. या इलेक्शन कमिशनबाबतचे सर्व अधिकार कायद्याने त्यांना आहेत, राज्य सरकारला देखील नाहीत असंही फडणवीस म्हणाले.
आज पुन्हा त्यांना भेटले, तीथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही, मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे, स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं. सगळे अधिकार त्यांना आहेत, निवडणूक यादी संदर्भात ते पहिल्यांदा विधानसभा, लोकसभेची जी व्होटर लीस्ट आहे, ती आधी जारी करतात, मग त्यानंतर सर्वांना त्यावर ऑबजेक्शनची संधी दिली जाते. या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजे, मात्र असं काहीही न करता, कायदा समजून न घेता केवळ एक नरेटिव्ह सेट करायचा, असा हा सगळा प्रकार आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.