Fadnavis is aggressive on the actions of Bhondu Baba : विरोधकांकडून तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण जोरात लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट आणि ठाम प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप समोर येत असून, महिलांच्या सत्मसन्मानाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
मूल्ह्यमंत्री म्हणाले की, तथाकथित अध्यात्मिक शक्तींचा दावा करणाऱ्या अशोक खरातने त्या शेतीचा गैरवापर करून अनेक महिलांची फसवणूक केली आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात महिलांचं मानसिक शोषण आणि ब्रेनवॉश करण्यात आल्याचं देखील तपासात उघड होत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ट्रॅप रचत कारवाई केली. अनेक दिवसांपासून गुप्तपणे तपास सुरू होता. सुरूवातीला पीडित महिला समोर येण्यास घाबरत होत्या, मात्र पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता एकामागोमाग अनेक महिला पुढे येत असून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणाचा विस्तार अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साताऱ्याचे SP तुषार दोषींनी शब्द दिला तरी… सभागृहात शिंदे आक्रमक होताच फडणवीसांनी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, ही कारवाई अचानक झालेली नसून तिची तयारी आधीपासूनच सुरू होती. सध्या देखील चौकशी सुरू असून, प्रत्येक पैलू बारकाईने तपासाला जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.
हा विषय राजकारणाचा नाही, तर महिलांच्या आत्मसन्मानाचा आहे, असं ठामपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याककडे नाही, या प्रकरणात ज्याचा दुरान्वयाने देखील संबंध आढळेल, त्याला सोडले जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
यासोबतच, या संपूर्ण प्रकरणावर उद्या सविस्तर निवेदन सादर करणार असल्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यभरात या प्रकरणाची तीव्र चर्चा सुरू असून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
