साताऱ्याचे SP तुषार दोषींनी शब्द दिला तरी… सभागृहात शिंदे आक्रमक होताच फडणवीसांनी…

DCM Eknath Shinde CM Devendra Fadanvis सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचे पडसाद विधान सभेमध्ये पडल्याचं पाहायला मिळालं.

DCM Eknath Shinde CM Devendra Fadanvis

DCM Eknath Shinde Agressive on Satara ZP crises CM Devendra Fadanvis Answer : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित असा विजय मिळवला आहे. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. मात्र या निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य फुटल्याने राजकीय समीकरणे बदलली. त्यातच मतदानासाठी येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेते तसेच मंत्र्यांची पोलिसांशी जोरदार झटापट झाली.

Tushar Doshi : मंत्र्यावर हात अन् वर्दीवर डाग; अंतरवाली ते सातारा… तुषार दोषींच्या वादाची ‘कुंडली’!

या झटापटीदरम्यान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेचे पडसाद थेट राज्याच्या विधान सभेत उमटले. यावर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळाल. त्याचवेळी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री झाली. तेव्हा फडणवीसांनी शिंदेना एका वाक्यात उत्तर देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील घटने संदर्भात शंभुराज देसाई आणि अर्जुन खोतकर यांनी माहिती मांडली. तसेच या घटनेचा मी साक्षीदार देखील आहे. त्या ठिकाणी जे काही घडत होतं. त्याबाबत मला कळवण्यात आलं होतं. त्यानंतर मी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना फोन केला होता. त्यांना सांगितलं होतं की, संबंधित लोकांवर जी काही कारवाई करायची आहे ती मतदानानंतर करा. कारण एखाद्या व्यक्तीला मतदान पासून वंचित ठेवणे योग्य नाही.

विधान परिषद निवडणूक मविआसाठी आव्हान! ठाकरे, गोऱ्हे कुणाचे कोणते सदस्य निवृत्त होणार

त्यानंतर मी याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना देखील फोन केला होता. त्यानंतर दाते यांनी दोषींना फोन केला होता. त्यावर दोषी म्हणाले होते की, मी कारवाई करत नाही. मला दाते यांचा फोन आला होता. मात्र तुषार दोषींनी कारवाई न करण्याचा शब्द देऊन देखील साताऱ्यामध्ये मोठा राडा झाला. सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवत लोकशाहीचा खून करण्यात आला. यावेळी मंत्र्यांना देखील बघितले गेले नाही. आरोपीप्रमाणे त्यांना घेऊन गेले. दोन जणांना कसे घेऊन गेले? महाराष्ट्राच्या इतिहासात अशी स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळाली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

तर शिंदेंच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी काही वस्तूस्थिती सांगितली. त्याची चौकशी केली जाईल. त्यानुसार कारवाई देखील होईल. दरम्यान साताऱ्याच्या या प्रकरणावर आक्रमक होत शिवसेना आणि राष्ट्रवादीने विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. त्यावर मुख्यमंत्री संतप्त झाल्याचे देखील माहिती समोर आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ज्यावेळी सभागृहा बाहेर गेले. त्यावेळी लगेचच जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील बाहेर पडण्याचे पाहायला मिळाले.

follow us