मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टाकलेली नवी गुगली नो बॉल असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवरुन राज्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
आता त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी फडणीसांवर टीकास्त्र सोडले आहे. तपासे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी गुगली देवेंद्र फडणीसांनी टाकली आहे. मात्र, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ही गुगली आता नो बॉल ठरली असल्याचं ते म्हणाले आहेत.
पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीस स्पष्टच बोलले, ‘शरद पवारांशी चर्चा…’
राज्यात सत्तेत असलेलं शिंदे-फडणवीस सरकारचा संविधानिक दर्जा अद्याप बाकी असून 14 तारखेनंतर सलग सर्वोच्च न्यायलयाच्या सुनावण्या होणार आहेत, अशातच महाराष्ट्राच्या राज्यपालाने विद्यमान सरकारने कोणतंही निमंत्रण दिलेलं नसल्याचं समोर आल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे या सरकारच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकत असल्याचं तपासेंनी स्पष्ट केलंय.
ही योजना केल्याशिवाय सोडणारच नव्हतो Ram Shinde
तसेच आता यावरुन नवीन राजकीय वाद पेटणार नवीन गुगली टाकण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केल्याचा दावा त्यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणावर शरद पवारांनी तत्काळ आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नसल्याचंही पवारांनी म्हंटलंय.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.