पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीस स्पष्टच बोलले, ‘शरद पवारांशी चर्चा…’

  • Written By: Published:
पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीस स्पष्टच बोलले, ‘शरद पवारांशी चर्चा…’

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचं सरकार स्थापन झालं होतं. विशेष म्हणजे भल्या पहाटे या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला होता. या पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झालं होतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची संमती होती, असं स्पष्ट विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आतापर्यंत पहाटेच्या शपथविधीबाबत भूमिका स्पष्टपणे मांडली नाही.

दरम्यान, आता फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सकाळच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. तसेच अजित पवार जर बोलले तर मी पुढे बोलेन असेही फडणवीस म्हणाले आहेत.

Jayant Patil नानांनी आम्हाला न सांगता राजीनामा दिला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube