Jayant Patil नानांनी आम्हाला न सांगता राजीनामा दिला

  • Written By: Published:
Untitled Design (2)

मुंबई : एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले की शरद पवार म्हणाले ते खरं आहे का? की नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना न विचारता राजीनामा दिला. त्यावर जयंत पाटील म्हणाले हो हे खरं आहे, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला नाविचारता आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

पुढे जयंत पाटील म्हणाले जेव्हा नानांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तेव्हा आम्हाला कळाले, तोपर्यंत आम्हाला काहीच माहित नव्हते, जेव्हा नाना विधानसभेचे अध्यक्ष झाले होते तेव्हा आम्ही तिन्ही पक्षाने एकत्र बसून, विचार करून तो निर्णय घेतला होता त्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा देताना आम्हाला विचारात घेणे गरजेचे होते.

जर त्यांनी आम्हाला याची कल्पना दिली असती तर राजीनामा दिल्यावर होणाऱ्या परिणामाची चर्चा झाली असती. त्यामधून काहीतरी मार्ग काढला गेला असता. त्यांनी राजीनामा दिला नास्ता तर आज जी परिस्थिती आहे ती वेगळी असती आज जर विधानसभेत आमचा अध्यक्ष असता तर सभागृहात बेकायदेशीर हालचाली झाल्या नसत्या.

Sharad Pawar गौप्यस्फोटावर महाजनांचा पलटवार, ‘देशमुखांनाच भाजपमध्ये येण्याची इच्छा’

यावर नाना म्हणाले…

हे खरं आहे कि मी इत्तर दोन पक्षांना नविचारता विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. परंतु मी राजीनामा देताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन उप मुख्यमंत्री अजित पवार यांना माझा निर्णय सांगितलं होता त्यामुळे मला माझा त्या निर्णयाचा अजिबात पश्चताप होत नाही. आणि मला माझा पक्ष नेतृत्वाने आदेश दिला तो मानाने माझा प्रथम अधिकार आहे.

 

 

Tags

follow us