Download App

…म्हणून शरद पवार देवेंद्र फडणवीसांचा राग करतात; सदाभाऊंचा गौप्यस्फोट

 Sadabhau Khot On Devndra Fadanvis and Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कधीही तुम्ही याच्यावर अटॅक करा किंवा त्याच्यावर अटॅक करा असे सांगितले नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. काही सल्ला आम्ही त्यांच्याकडे घ्यायला जातो, त्यावेळी ते या आंदोलनातून काय हाती लागेल याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आम्हाला करतात. एसटीच्या आंदोलनात देखील त्यांनी हे आंदोलन आता थांबवा, यापुढे कोणतेही सरकार आले तरी यापेक्षा जास्त देऊ शकणार नाही, असे आम्हाला सांगितले. असे राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

सदाभाऊ खोत हे लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलत होते. लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांना गोपीचंद पडळकर व तुम्हाला पवारांवर टीका करायला फडणवीसांनी सांगितले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर त्यांनी उत्तर दिले आहे.

मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान

तसेच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती यशवंतरावांनाही हरवू शकतो, वसंत दादांनाही शह देऊ शकतो आणि दिल्लीलाही झुलवू शकतो, असा  आभास शरद पवारांनी तयार केला होता. ते मोडण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. बऱ्याचदा त्यांची बिचाऱ्याची जात आडवी येते. महाराष्ट्राचा राजकारणात देशमुख- पाटील असला की तो सगळीकडे चालतो.  हे ब्राह्मण असून यांचा आडनाव जर देशमुख असतं तर सगळ्यांना वाटल असतं हे आपल्याच  जात कुळीतला आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा सेटबॅक आहे, असे सदाभाऊ म्हणाले आहेत.

‘मूठभर मैदान अन् मूठभर संख्या’; मविआच्या सभेवरुन शेलारांचा टोला

शरद पवारांना दोन हात करणारा हा पहिला पठ्या भेटला आहे. याचे कारण त्यांचे कारखाने नाही, सूतगिरणी नाही, शिक्षणसंस्था नाही त्यामुळे या गड्यांना त्यांच्यामध्ये  काही सापडत नाही. त्याच्यामुळे शरद पवारांना फडणवीस यांचा राग नाही, पण ते पवारांच्या टोळीत सामील होत नाही म्हणून राग आहे. शरद पवार हे कायम आपल्या टोळीला बरोबर घेऊन जाणाऱ्याला पाठिंबा देतात. सुशिलकुमार शिंदे यांनी त्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पवारांनी त्यांना खुर्चीवरून खाली केले, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

Tags

follow us