‘मूठभर मैदान अन् मूठभर संख्या’; मविआच्या सभेवरुन शेलारांचा टोला
Aashish Shelar On MVA Mumbai Sabha : महाविकास आघाडीची आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या बीकेसी मैदानावर वज्रमूठ सभा होत आहे. महाविकास आघाडीची ही तिसरी वज्रमूठ सभा आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे वज्रमूठ सभा पार पडली आहे. यानंतर आता मुंबईत आज ही सभा होत आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता भाजपचे नेते व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.
मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा! महाविकास आघाडीची आज तिसरी वज्रमूठ सभा होत आहे. मूठभर मैदान आणि मूठभर संख्या पण आवाज मात्र मोठा,म्हणत त्यांनी या सभेवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सभेसाठी जे मैदान पार्किंग साठी वापरण्यात येते त्या मैदानावर ही सभा होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रवास मुंबईतील शिवाजी पार्क त्यानंतर बीकेसी मैदान व आता बीकेसीचे छोटे मैदान असा झाला आहे, असा टोला शेलारांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान
तसेच ईश्वर निष्ठांकडून त्यांचा प्रवास आता कम्यूनिस्टांकडे झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या इथून पुढील सभा या नरे पार्कातच होतील. त्यामुळे आवाज मोठा जरी असला तरी लोकं जमवण्यामध्ये हे सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मुंबईत जनसमर्थनच नाही. त्यामुळेच छोट्या मैदानावर सभा घ्यायला लागली हे स्पष्ट दिसते आहे, असे म्हणत शेलारांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.