Father strangled little girl who asked for chocolate; Heartbreaking act of alcoholic father : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कुटुंबियांकडूनच नातलगांच्या अन् चिमुकल्यांच्या हत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यात पनवेलमध्ये 20 दिवसांच्या चिमुकलीला रस्त्यावर सोडणाऱ्या आई-बापानंतर आता एका मद्यपी पित्याने आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला केवळ चॉकलेटसाठी पैसे मागितले म्हणून गळा दाबून मारून टाकले आहे.
नेमकं प्रकरण काय?
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालूक्यातील भीमा तांडा येथे रविवारी ही घटना घडली. आरोपी बाप बालाजी राठोड दारू पित असल्याने त्याचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी टोकाचे वाद होत होते. त्यात रविवारी देखील त्यांचे वाद झाले होते. त्यामुळे पत्नी वर्षा नवऱ्याला सोडून वडिलांकडे राहायला गेली होती. त्यावेळी त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीने बालाजीला चॉकलेटसाठी पैसे मागितले असता त्याने नकार दिला. मात्र ती हट्ट करू लागली. तेव्हा त्याने तिचा दोरीने गळा आवळून हत्या केली.
आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात १५% सुट, ST महामंडळाची नवी योजना १ जुलैपासून लागू…
हा सर्व प्रकार मुलीच्या आईला कळाला असता तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पत्नीने या पतीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर पोलिस आता पुढील तपास करत आहेत. मात्र घटनेमुळे परिसरासह राज्याभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
kolhapur Politics : संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा, पदाधिकाऱ्यांचा गोंधळ
सांगली जिल्ह्यातली एक अशी घटना, जी ऐकून तुमच्या काळजात धस्स होईल. एका मुख्याध्यापक वडिलांची आणि त्यांच्या १७ वर्षांच्या मुलीची. शिक्षणाच्या नावाखाली, गुणांच्या दबावाखाली, एका निष्पाप जीवाचा अंत झाला. पाहूया नेमकं काय घडलं? सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी गाव. इथे राहतात धोंडीराम भोसले – नावाजलेले मुख्याध्यापक. त्यांची १७ वर्षांची मुलगी साधना – अतिशय हुशार, दहावीला ९२ टक्के गुण मिळवणारी. पण यंदाच्या नीट चाचणी परीक्षेत साधनाला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. शुक्रवारी रात्री साधना घरी आली, वडीलांनी तिला गुणांबद्दल विचारलं. रागाच्या भरात, विचार न करता, त्यांनी घरातल्या जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारलं. मारहाण इतकी भयंकर होती, की साधना गंभीर जखमी झाली.
सर्वात धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर साधना बेशुद्ध अवस्थेत घरात पडून होती. वडील दुसऱ्या दिवशी योगा क्लाससाठी निघून गेले, पण मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं नाही. अखेर, शनिवारी सकाळी साधनाला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. साधनाच्या आई प्रीती भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक केली.