Download App

वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चावर बनवला, टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane On Uddhav Thackeray : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा

  • Written By: Last Updated:

Narayan Rane On Uddhav Thackeray : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा कोळल्याने राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीकडून (MVA) राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आज राजकोट किल्ला परिसरात ठाकरे गटाचे आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे कार्यकर्ते भिडल्याने मोठा राडा झाला आहे. तर आता नारायणे राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवद्रोही भाषा वापरतात, काय ती ठाकरेंची भाषा अशी टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोळल्याची घटना दुर्देवी होती. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते मात्र ऐन पावसाळ्यात हा पुतळा कोसळला. मी यामध्ये कोणाला आरोप करणार नाही. हा पुतळा जे कोणी बांधला त्यांची चौकशी करावी तसेच हा पुतळा का? कोसळला याची देखील चौकशी व्हावी अशी माझी आणि जनतेची इच्छा आहे असं माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, निवडणुका समोर असल्याने काही विरोधक याचा भांडवल करत आहे. या जिल्ह्यात त्यांना भाजपवर टीका करण्याचा कोणताही कारण मिळत नसल्याने शिवसेना (उद्धव गट), शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस या पुतळ्यावरून आमच्यावर टीका करत आहे. या जिल्ह्यात पुतळा तयार झाला तेव्हा जिल्ह्यातील लोकं नतमस्तक झाली महाराजांसमोर मात्र आज बाहेरून आलेले सर्व पुढारी गेल्या आठ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आले नाही असेही यावेळी नारायण राणे म्हणाले.

शिवद्रोही हे लोकं आहे असं उद्धव ठाकरे म्हणत आहे मात्र त्यांच्याकडून चांगल्या भाषेची काय अपेक्षा करणार, त्यांनी शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाला निर्वाहाचा साधन बनवलं आणि पैसे कमावले असा आरोप देखील यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर लावला.

आनंदाची बातमी! राज्यातील मंतैय्या बेडके आणि सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

उद्धव ठाकरेंनी महाराजांचा एकही पुतळा उभारला नाही. स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील भारत सरकारच्या खर्चावर बनावला. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. तसेच या जिल्ह्यासाठी अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी काय केला. या जिल्ह्याला किती रोजगार दिला? असा प्रश्न देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

follow us