नगर पुन्हा हादरले! घोडेगावात टोळीयुद्धातून गोळीबार, रुग्णालयात देखील राडा, एकाचा मृत्यू

Firing Ahilyanagar Ghodegaon या ठिकाणी पुन्हा एकदा टोळी युद्धातून गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे.

Firing Ahilyanagar Ghodegaon

Firing Ahilyanagar Ghodegaon

Firing due to gang war in Ahilyanagar Ghodegaon, riots also in the hospital, one person dies : बुधवारी 11 फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या गोळीबारानंतर आता अहिल्यानगर पुन्हा एकदा हादरले आहे. कारण आता अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी पुन्हा एकदा टोळी युद्धातून गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यांनी आमचे डोळे उघडले; रोहित पवारांकडून पटेल, तटकरेंच्या नावाच्या उल्लेख, रूपाली ठोंबरेंकडून समर्थन

या गँगवॉरमध्ये दोन्ही गटाकडून गोळीबार झाल्याने दोन्ही गटातील रुग्ण गंभीर जखमी झाले होते. यातील नितीन शिरसाठ हा व्यक्ती गोळीबारात मृत झाल्याची माहिती असून दुसरा व्यक्ती फुलमाळी हा गंभीर जखमी झाला असून त्याला आता पुढील उपचाराकरिता पुणे येथे हलविण्यात आले आहे.

…त्यामुळे अमित शाहांनी अजितदादांच्या अपघाताबाबत वेळ दिली नसावी; रोहित पवारांनी सांगितलं कारण

मात्र ही घटना जुन्या वादातून झाली असल्याची बोलले जात आहे. दोन्हीही रुग्णांना अहिल्यानगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हॉस्पिटल येथे उपचार साठी आले असता येथे दोन गटात राडा झाला त्यामुळे हॉस्पिटल परिसरात छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रुग्णालयात दाखल झाले यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेऊन तणाव नियंत्रणात आणला.

शैक्षणिक सहलीची बस उलटली; नेवाशातील तीन शिक्षकांसह अकरा विद्यार्थी जखमी

त्या अगोदर अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज चेंबरसमोर रात्री सुमारे सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या गोळीबारात अब्रार मुख्तार शेख हा 25 ते 30 वर्षे वय असणारा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रपुरातील उबाठा भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

प्राथमिक माहितीनुसार, अबरार शेख हा राज चेंबरसमोर उभा असताना अचानक त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळी त्याच्या शरीराच्या खालच्या भागावर लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गोळीबाराच्य घटनेनंतर परिसरात एकचं गोंधळ उडाला. स्थानी नागरिकांनी तातडीने या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली आणि जखमी अबरारला ताटाकल जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ना संपूर्ण धावपट्टी, ना यंत्रणा; बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघन

या घटनेमागे मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यद याचे नाव समोर येत असल्याची माहिती आहे. वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमका वाद कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर येऊ शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

खासदार निलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; ‘त्या’ तीन मुद्द्यांवर केली सविस्तर चर्चा

या गोळीबाराच्या घटनेमुळे कोठला आणि मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान जखमी अबरार शेख याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती असून पुढील तपस सुरू आहे.

Exit mobile version