Download App

सलग पाच दिवसांची सुट्टी; 29 सप्टेंबरला सरकारी सुट्टी जाहीर, CM शिंदेंचा निर्णय…

Image Credit: letsupp

Cm Eknath Shinde : लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता उद्या म्हणजेच 28 सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या व्यवस्थापनास मदत होण्याच्या उद्देशाने 29 सप्टेंबरलाही शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी हा निर्णय घेतला आहे.

हिंदु आणि मुस्लिम समाजात जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी राज्यात शांततेचं वातावरण रहावं तसेच पोलिसांना मिरवणुकांचं नियोजन करण्यासाठी शक्य व्हावं, त्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सूट्टी जाहीर करण्याची विनंती ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.

पाच दिवसांची सुट्टी कशी?
उद्या गुरुवार 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी त्यानंतर आता शुक्रवार 29 रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्यात आली, त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्ट्यांचे आहेत. रविवारनंतर सोमवारी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे नागरिकांना आता सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

Sonu Nigam कडून बिटर बिट्रेयल्सची घोषणा ‘अच्छा सिला दिया’ च्या आठवणींना उजाळा

यंदा गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण एकत्रच 28 सप्टेंबरला आले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनावर बराच ताण येण्याची शक्यता वर्तवली जात होती. हाच ताण कमी करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून ईद- ए- मिलाद च्या दिवशी काढण्यात येणारा जुलूस किंवा मिरवणूक ही सप्टेंबर 29 म्हणजे एक दिवस नंतर काढण्यात येणार आहे.


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल; त्याशिवाय मराठा समाज…; जरांगे आक्रमक

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागांत गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन 29 सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत माता की जय…बावनकुळेंनी थांबवलं, मोदी मोदी म्हणा…बावनकुळेंच्या भोवती नवा वाद !

उद्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत, तसेच ईद-ए-मिलादनिमित्तही मिरवणुका काढण्यात येतात, त्यामुळे दोन्ही मिरवणुका शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात याव्यात, तसेच शांततेत गणरायाला मनोभावे निरोप देण्यात यावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. त्याचप्रमाणे दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झालं, येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा-दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तीभावाने हे सण पार पाडावेत, राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Sanjay Raut : 2024 च्या आधी भाजप फुटणार! NDA फक्त नौटंकी; राऊतांचा दावा

गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. 1 ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज