भारत माता की जय…बावनकुळेंनी थांबवलं, मोदी मोदी म्हणा…बावनकुळेंच्या भोवती नवा वाद !

  • Written By: Published:
भारत माता की जय…बावनकुळेंनी थांबवलं, मोदी मोदी म्हणा…बावनकुळेंच्या भोवती नवा वाद !

अहमदनगर: सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना आहे. भाजपला मात्र भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावण्याचा निंदनीय किळसपणा प्रकार घडलाचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामांची घोषणा सुरू असताना त्यांना मात्र ती द्यावीशी वाटली नाही, असे म्हणत भाजपचे (BJP) हिंदुत्वाचे आणि देशाप्रतीचे प्रेम बेगडी असल्याचा आरोप नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज, 30 हून अधिक विद्यार्थी जखमी

बावनकुळे नुकतेच नगरमध्ये येऊन गेले. यावेळी पत्रकारांसंदर्भात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप राज्यभर चांगलीच व्हायरल झाली. त्याचा राज्यभर निषेध सुरू असताना त्यातच अहमदनगर शहर काँग्रेसने आता बावनकुळेंचा वादग्रस्त व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला आहे. सोशल मीडियात तो चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे भाजपला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Video: पुण्यातील साने गुरुजी मित्रमंडळाच्या देखाव्याला आग, आरतीला आलेल्या जेपी नड्डांचीही पळापळ !

काँग्रेसने उघड केलेल्या व्हिडिओमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मोदींचे फोटो असलेली पत्रके वाटताना दिसत आहे. मोदींच्या नावाच्या घोषणा उपस्थितांना द्यायला सांगत आहेत. यावेळी भारत माता की जय अशी घोषणा देणाऱ्याला त्यांनी हात करून घोषणा बंद करायला सांगत मोदींची घोषणा द्यायला सांगत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

अहमदनगर शहर ही धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रयोगशाळा झाली आहे. बावनकुळे, आ. नितेश राणे यांसारखे वेगवेगळे भाजपचे नेते नगर शहरात वारंवार येतात. हिंदूंच्या भावना दुखावतात. धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, असा आरोपही काळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे नगर दौऱ्यावर होते. त्यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एक विधान केले होते. विरोधात बातम्या येऊ नये याची काळजी घ्या, पत्रकारांना चहा पाजा, त्यांना धाब्यावर घेऊ जा, असे बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यावरून राज्यभरातील पत्रकारांनी त्यांची निषेध करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube