Video: फटाके फुटले ! पुण्यात गणेश मंडळाच्या देखाव्याला लागली आग, नड्डांनी आरती सोडली

  • Written By: Published:
Video: फटाके फुटले ! पुण्यात गणेश मंडळाच्या देखाव्याला लागली आग, नड्डांनी आरती सोडली

Pune Ganesh festival 2023: पुण्यातील साने गुरुजी मित्रमंडळाच्या (Sane gurji mandal) महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीच्या कळसाला आग लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) हे आरतीसाठी आले होते. त्याचवेळी ही आग लागली. नड्डा यांनी आरती अर्धवट सोडली. नड्डा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, गणेशभक्तांची पळापळ झाली आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटामध्ये विझली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Ansh Duggal करणार आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण

पुण्यात गणेशोत्सव जोरदार साजरा होत आहे. आगामी काळात निवडणुका असल्याने राज्यातील, देशातील नेतेही मंडळांना भेट देत आहेत. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही मुंबईत मंगळवारी दाखल झाले. अनेक ठिकाणी गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर जे.पी. नड्डा हे पुण्यात गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते.भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी तरुण मंडळाला भेट देण्यासाठी नड्डा आले.


Dhangar Reservation वर कार्यवाही 50 दिवसांत पूर्ण करणार; महाजनांनी उपोषणकर्त्यांना दिले लेखी पत्र

साने गुरुजी मित्रमंडळाने यंदा महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारला आहे. नड्डा हे आरती करत होते. त्याचवेळी देखाव्याच्या मंदिराच्या कळसाला आग लागली. ही आग लागल्याचे कळल्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला. नड्डा हे भाजप पदाधिकारी, गणेशभक्त यांची चांगलीच पळापळ झाली. दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाल्यानंतर आगही विझली गेली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यानंतर जेपी नड्डा हे कोथरुड येथे आरतीसाठी गेले.


फटाकांमुळे लागली आग

देखाव्याला आग लागल्याचे कारणही आता समोर आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या स्वागतासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यात फटाकांच्या थिणग्याही देखाव्याच्या मंदिरावर पडल्या. त्यामुळे आग लागल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते व अग्निशमन दलाकडून आग विझविण्यात आली आहे. यात कुणीही जखमी झालेले नाही. या आगीची पर्वती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube