Download App

Accident : अमरावतीमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू; 7 गंभीर जखमी

Five dead in Amaravati Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अंजनगाव मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटवर पुन्हा धमकी

मिळालेल्या माहितीनुसार बसमधून 12 प्रवासी करत होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील एकाच कुटुंबातील 12 जाण लग्नासाठी अमरावती जिल्ह्यतील अंजनगाव-सुरजी येथे गेले होते. लग्नाहून दर्यापूरला परत येताना यावेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने या बसला जोरदार धडक दिली.

यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यात शेख अझहर शेख अन्वर 35, नासिया परवीन शेख अझहर 30, अन्सारा परवीन शेख अझहर (9) यांच्यांसह अन्य दोघांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना तातडिने उपजिल्हा रूग्णालय दर्यापूरला दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

Aditya Singh Rajput Dies: स्प्लिट्सविला 9 फेम अभिनेता ‘आदित्य सिंग राजपूत’चे निधन; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी सुरू असून जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास खल्लार पोलीस करत आहेत.

Tags

follow us